मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सन इंडस्ट्रीचे FMCG युनिट रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स(Products) लिमिटेडने बाटलीबंद पाण्याच्या सेगमेंटमध्ये उडी घेतली आहे. कंपनीने SURE या नावाने मिनरल वाटर लाँच केले आहे. या नवीन ब्रँडची किंमत बिसलेरी आणि Kinley पेक्षा अत्यंत कमी आहे. पण पिण्याच्या पाणी विक्रीच्या बाजारात यामुळे खळबळ उडाली आहे. या क्षेत्रात आता वॉर रंगण्याची शक्यता आहे.शुअर हा एक उच्च गुणवत्तेचा ब्रँड आहे. तो बजेट फ्रेंडली असेल. इतर ब्रँडपेक्षा त्याची किंमत अत्यंत कमी असेल. त्यामुळे बाजारपेठेत मोठा खळबळ उडेल. रिलायन्सने यापूर्वी कॅम्पा कोला सारख्या बेव्हरेजजनंतर आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. दैनंदिन उत्पादनांच्या बाजारात रिलायन्स उतरले आहे. 30 हजार कोटींच्या पॅकेज्ड पाणी बाजारात रिलायन्स आता मोठा खेळाडू होऊ पाहत आहे.

250 मिलीलीटर Sure पाणी बॉटलची किंमत 5 रुपये इतकी आहे.(Products)कॅम्पा शुअर येत्या दोन आठवड्यात उत्तर भारतातील बाजारात दाखल होईल. तर या ब्रँडच्या मोठ्या पॅकची किंमत इतर कंपन्यांच्या तुलनेपेक्षा 20-30% कमी आहे. एक लिटर कॅम्प शुअरच्या पाण्याची बॉटल 15 रुपयांना मिळेल. तर बिसलेरी, कोका-कोला, किन्ले, पेप्सिकोची एक्वाफिनाची किंमत सध्या 20 रुपये इतकी आहे. तर दोन लिटरच्या पॅकची किंमत 25 रुपये इतकी आहे. तर दोन लिटर पॅकची प्रतिस्पर्ध्यांची किंमत 30-35 रुपये इतकी आहे.

रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स हे नवीन पाण्याचा ब्रँड कॅम्पा शुअरसाठी स्थानिक पाणी उत्पादकांशी करार करण्याची शक्यता आहे. त्यासाठीची तयारी सुरू आहे. त्याआधारे त्वरीत स्थानिक बाजारपेठेत हे उत्पादन येईल. त्यासाठीचा दळणवळणाचा खर्च वाचेल आणि किंमती कमी ठेवण्यासाठी हा प्लॅन यशस्वी ठरेल. यामुळे स्थानिक बाजारपेठेत रोजगार वाढेल. तर 30 हजार कोटींच्या या पाणी सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा दिसून येईल.(Products)आता जीएसटी कपातीचा अजून फायदा या ब्रँडला होणार आहे. जीएसटी सुधारणामधये पॅकेज्ड पाणी, यामध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम मिनरल वॉटरचा समावेश आहे. यावर अगोदर 18 टक्के जीएसटी लागू होता. आता हा जीएसटी 5 टक्क्यांवर आला आहे.

हेही वाचा :

आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .

राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…