स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधीच जिल्ह्यात मोठा राजकीय(political party) भूकंप होणार असून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचा सफाया होणार असल्याचे चित्र आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची मोठी ताकत होती. २०१४ च्या मोदी लाटेतही जिल्ह्याने काँग्रेस पक्षाला ताकद दिली होती. माजी आमदार संजय जगताप व संग्राम थोपटे यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकटी मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता.

मात्र नवीन राजकीय समीकरणे घडल्याने संजय जगताप व संग्राम थोपटे या दोघांनी भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना मानणारे जिल्हा काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या अवस्था दोलायमान झाली होती. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला घरघर लागल्याचे चित्र होते.

जगताप व थोपटे भारतीय जनता पक्षात गेले तरी त्यांना मानणारे दोन्ही गट काँग्रेस पक्षात सक्रिय होते. संजय जगताप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असतानाही काँग्रेस पक्षात उघड दोन गट कार्यरत होते. नुकतीच श्रीरंग चव्हाण यांची पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मात्र चव्हाण हे संग्राम थोपटे यांचे निकटवर्तीय असल्याचे समजले जाते.

त्यामुळे संजय जगताप यांना मानणारा काँग्रेसमधील(political party) गट नाराज झाला असून, पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

हेही वाचा :

हे असं आपल्या इथं,..मुंबईत घडू शकत?

आता महिलेला पाहून ‘शिट्टी’ वाजवण्यापूर्वी विचार करा! कोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निकाल

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक