कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : अमेरिकेतील लॉस एंजल्स (हॉलीवुड), जुगार नगरी शिकागो, फ्रान्समधील पॅरिस, किंवा अन्य प्रगत राष्ट्रांमध्ये अंदा धुंद गोळीबार, अपहरण, पब मध्ये किंवा शाळांमध्ये निरापराध लोक, विद्यार्थी(student) यांच्यावर गोळीबार अशा घटना अधून मधून घडत असतात. अशा घटनांचे खापर तेथील लाईफस्टाईलवर फोडले जाते.

अशा प्रकारच्या घटना आपल्याकडे घडणार नाहीत, घडणे शक्य नाही कारण ती आपली संस्कृती नाही अशा प्रकारची एक ठाम धारणा मांडली जात होती पण आता रोहित आर्य या तथाकथित कलाकाराने या धारणेला फाट्यावर बसवताना स्वतःचा जीव गमावला आहे. गुरुवारी मुंबईत पवई परिसरात शासकीय पैशाच्या वसुलीसाठी घडलेल्या अपहरण घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. हे असं इथं आपल्याकडे घडू शकतं? अशा प्रश्नांकित प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाही तरच नवल!

“माझी शाळा! सुंदर शाळा!” हा प्रकल्प दिग्दर्शक आणि लेखक रोहित आर्या याने राज्य शासनासाठी हाती घेतला होता. या प्रकल्पाचे पैसे राज्य शासनाने थकवले आहेत. संपूर्ण राज्याचे या थकबाकीकडे लक्ष वेधण्यासाठी त्याने गुरुवारी लहान 17 मुलांना(student) ओलीस ठेवून प्रसंगी त्यांना ठार मारले जाईल असे वातावरण निर्माण केले होते. या घटनेने पोलीस यंत्रणा हादरून गेली होती. त्यांच्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन रिस्की होते. कारण प्रश्न होता त्या 17 लहान जीवांच्या सुरक्षिततेचा. रोहित आर्य याच्याकडून काहीही घडू शकते, अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर करून टाकला. पवई येथील बटरफ्लाय नर्सरी परिसरातील एका स्टुडिओमध्ये घडलेला हा थरारक प्रकार पोलिसांचे मॉक ड्रिल तर नव्हे असे पाहणाऱ्याला वाटावे.

रोहित आर्य याने ऑडिशन्सच्या माध्यमातून लहान मुलांना स्टुडिओ चांगले होते. रुचिता जाधव या अभिनेत्रीला सुद्धा एका चित्रपटाचे शूटिंग आहे असे सांगून तिलाही गुरुवारी पवई येथील बटरफ्लाय नर्सरीत येण्यास सांगितले होते. पण ही अभिनेत्री घरगुती अडचणीमुळे गुरुवारी तिथे पोहोचली नाही हे तिचे नशिबच म्हणायचे. रोहित आर्य याच्या मनात काहीतरी भयंकर शिजत होते एवढे मात्र निश्चित. त्याचे मानसिक संतुलन थोडे जरी ढळले असते तरी भयंकर घडले असते. पण तरीही गुरुवारी घडलेला हा थरार एखाद्या हिंदी चित्रपटात शोभावा असा होता.

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने रोहित आर्य याने केलेला दावा फेटाळून लावला आहे. शिक्षण विभागाकडून त्याचे कोणतेही पैसे थकवले गेलेले नाहीत आणि नव्हते. असा खुलासा केला गेला असला तरी राज्याचे माझी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मात्र रोहित आर्य हा अगदीच खोटे बोलत नाही अशा आशयाची प्रतिक्रिया दिली आहे. रोहित ने शासनाशी संवाद साधणे आवश्यक होते. त्यासाठी लहान मुलांना पोलीस ठेवणे अनुचित आहे. चर्चेने प्रश्न सुटला असता असे ते म्हणाले आहेत.

आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी राज्यातील मीडियामध्ये आणि समाज माध्यमांमध्ये या ओलीस थरार नाट्याची दिवसभर चर्चा होती. नेहमीप्रमाणेच पोलिसांच्या एन्काऊंटर बद्दल आक्षेप घेतला जाऊ लागला आहे. रोहितच्या छातीमध्ये गोळ्या घुसल्या आहेत. म्हणजे त्याला ठार मारायचे होते असा निष्कर्ष काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काढलेला आहे. रोहित वर फायरिंग करण्याची खरोखरच गरज होती का? असा सवाल काहीजण उपस्थित करत आहेत. रोहित कडे अग्नि शस्त्र होते आणि त्याचा त्याच्याकडून दुरुपयोग झाला असता. म्हणून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

लहान मुलांचा(student) जीव टांगणीला लागलेला होता. त्यांच्याबद्दल काही बरे वाईट घडू शकले असते. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून त्याचा एन्काऊंटर केला गेला असा पोलिसांचा दावा आहे. अशा प्रकारे लहान मुलांना ओलीस ठेवून आपल्या काही मागण्या शासनासमोर मांडण्याचा हा भारतातील, महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार आहे. नाना पाटेकर यांच्या”प्रहार”या सिनेमात स्कूल बस ओलीस ठेवण्याचा काही दहशतवाद्यांकडून प्रयत्न झाल्याचा प्रसंग दाखवला आहे. त्याची आठवण यावी असा हा प्रकार आहे.

असे प्रकार काही प्रगत राष्ट्रांमध्ये घडलेले आहेत किंवा घडत असतात. शाळेतील वर्गामध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. आपल्या काही मागण्या जगासमोर मांडण्याचा प्रयत्न अशा घटनांच्या माध्यमातून केला जातो. काही वर्षांपूर्वी रशियातील एक नाट्यगृह दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले होते.

आमच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत तर या थिएटर मधील रसिक प्रेक्षकांना गोळ्या घालून ठार मारले जाईल अशी धमकी दहशतवाद्यांनी रशियन सरकारला दिली होती. एकूणच आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, आपल्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आहे अशी मानसिकता बनल्यानंतर पुढचे पाऊल म्हणून पोलीस नाट्य घडवून आणले जाते. जेणेकरून राज्य शासनाने आपली मागणी मान्य करावी असा हेतू यामागे असतो पण तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही. रोहित आर्या यांने सुद्धा
सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी केलेले हे थरारनाट्य असले तरी, त्याचे मानसिक संतुलन काही क्षणासाठी बिघडले असते तर भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले असते.

आता या एकूण ओलीस नाट्य प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी होईल. पण त्याचे अहवाल कधीच समाजासमोर येणार नाहीत.
रोहितची मागणी कदाचित रास्त असेल पण त्यासाठी त्यांने स्वीकारलेला मार्ग अतिशय अयोग्य आणि चुकीचा होता.

हेही वाचा :

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली

चक्रीवादळाचा राज्यावर होणार परिणाम, पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

स्मार्टफोनची जगभर चर्चा! 200MP Zeiss कॅमेऱ्याने दिली DSLR ला टक्कर