ऑक्टोबर महिना संपल्यानंतर आता नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. ऑक्टोबरमध्ये दसरा, धनत्रयोदशी, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात तुम्ही बँकेतील(Banks) काही कामाचं नियोजन करत असताल तर तुम्हाला बँका किती दिवस बंद राहणार आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. नोव्हेंबर महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार या दिवशी असणाऱ्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे.

भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॅलेंडरनुसार नोव्हेंबर महिन्यात बँका काही ठिकाणी सणांच्या निमित्तानं बंद राहतील. ती राज्य सोडून इतर सर् राज्यांमध्ये बँकांचं कामकाज सुरु असेल. बँका जरी बंद असल्यातरी ग्राहक नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सारख्या डिजिटल सेवांच्या मदतीनं पैशांची देवाण घेवाण, बिल पेमेंट, शिल्लक तपासणी ही कामं पूर्ण करु शकतात.

1 नोव्हेंबर: कर्नाटक राज्य स्थापना दिवसानिमित्त कर्नाटकातील सर्व सरकारी आणि खासगी बँका(Banks) बंद राहतील. दक्षिण भारतातील कन्नड भाषिकांचं मिळून कर्नाटक राज्य स्थापन केलं गेलं होतं. याच दिवशी डेहराडूनच्या सर्व बँका बंद राहतील, कारण तिथं इगास-बग्वाल सण साजरा केला जातो. ज्याला मोठी दिवाळी असं म्हटलं जातं.

5 नोव्हेंबर – या दिवशी बँका आयझोल, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, डेहराडून, हैदराबाद, इटानगर, जयपूर, जम्मू, कानपूर, कोहिमा, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगरमध्ये गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि रहस पौर्णिमा सारख्या सणांमुळं बँका बंद राहतील.

6 नोव्हेंबर – नोंगक्रेम नृत्यानिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.

7 नोव्हेंबर – वांगला उत्सवानिमित्त सर्व बँका बंद राहतील.

8 नोव्हेंबर – बंगळुरुत कनकदास जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.

11 नोव्हेंबर- सिक्कीममध्ये ल्हाबाब दुचेन निमित्त बँकांना सुट्टी राहणार आहे. बौद्ध धम्मासाठी खास दिवस आहे.

नोव्हेंबरमधील साप्ताहिक सुट्ट्या
2 नोव्हेंबर (रविवार), 8 नोव्हेंबर (दुसरा शनिवार), 9 नोव्हेंबर (रविवार) या दिवशी देशभरात बँका बंद राहतील.

16 नोव्हेंबर (रविवार), 22 नोव्हेंबर (चौथा शनिवार) या दिवशी बँका बंद राहतील.

23 नोव्हेंबर (रविवार) आणि 30 नोव्हेंबर (रविवार)

हेही वाचा :

आजपासून आधार कार्डच्या नियमात बदल…

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

हुपरी पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यासह पंटर ७० हजार रुपयांची लाच घेताना जाळ्यात