कोल्हापूर : पट्टणकोडोली परिसरात लाचलुचपत विभागाने आज (शनिवार) कारवाई करत पोलिस पंटर रणजीत बिरांजे याला ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तीनपानी जुगार अड्यावर झालेल्या छाप्यातील आरोपींकडून सुटका करून देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.

लाच मागणारा संशयित पोलिस संदेश शेटे मात्र कारवाईची खबर लागताच फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी (ता. २९) संदेश शेटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गट क्रमांक ९२५ येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्यावर छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान अमली पदार्थही आढळल्याची चर्चा आहे. नंतर तक्रारदाराकडून सुटकेसाठी एक लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती, मात्र शेवटी ७० हजारांवर व्यवहार ठरला.
लाचलुचपत विभागाने सापळा रचत रणजीत बिरांजे याला आपल्या घरातच लाच स्वीकारताना पकडले. पोलिस संदेश शेटे मात्र फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
हेही वाचा :
महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक
काँग्रेस पक्षाला भगदाड! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार
कतरिनाचे खासगी क्षण झाले Viral, सोनाक्षी सिन्हा संतापली