राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. नुकतंच अजित पवार यांनी पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. पुणे मनपात भाजप(politics) राष्ट्रवादीला सोबत घेण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्यामुळे अजित पवारांनीही आपल्या शिलेदारांना स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

अजित पवारांनी पुण्यात माजी नगरसेवकांच्या बैठकीत मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीच्या सर्व माजी नगरसेवकांच्या बैठकीत अजित पवारांनी(politics) स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. प्रभाग रचना आली असून, तशी लढण्याची तयारी ठेवा असं अजित पवार म्हणाले आहेत. सुचना हरकतीत जे काही बदल होतील ते होतील, पण स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
पुणे मनपात भाजपा राष्ट्रवादीला सोबत घेण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्यामुळे अजित पवारांनीही आपल्या शिलेदारांना स्वबळावर लढण्याचे दिले स्पष्ट संकेत दिले आहेत. प्रभाग रचनाही भाजपच्याच सोईची असल्याने राष्ट्रवादी नगरसेवकांच्या तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज पक्ष नगरसेवकांची बैठक बोलावली होती.
राज ठाकरेंनी ठाण्यात मनसैनिकांसोबत झालेल्या बैठकीत आदेश दिले आहेत. निवडणुकीला लागा, युती आघाडी की बाकी काय ते नंतर सांगतो. मनसेची आपली ताकद आहे ती आणता बळकट करा असा कानमंत्र राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला आहे. निवडणूक याद्यांवर काम करा, बूथ टू बूथ माणसे निवडा. त्यावर काम करा, मतदार याद्या वारंवार चाळा. एक महिन्यात मी तुम्हाला पुन्हा विचारणार काय काम केले आणि लवकरच पुन्हा एकदा पदाधिकारी मेळावा लावणार असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
हेही वाचा :
गोकुळच्या दूध दरात झाली वाढ; म्हैस-गायीचे दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागले
‘शक्तिपीठ’विरोधी आंदोलन होणार तीव्र, सतेज पाटील, राजू शेट्टींची ताकद लागणार पणाला…
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी