गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे उलटफेर होत आहेत. (wedding)आज मात्र सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. मात्र लग्नसराईच्या दिवसांतच सोन्याच्या दरात चढ-उतार होत असल्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.अमेरिका फेडरल रिझर्व्हकडून एमओएमसी बैठक 9 आणि 10 डिसेंबर रोजी होत आहे. त्यामुळं व्याजदरात कपात होऊ शकते, अशी अपेक्षा गुंतवणुकदारांमध्ये वाढली आहे. त्यामुळं गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणुक म्हणून सोन्याच्या गुंतवणुक करत आहेत. त्यामुळंच सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळतेय.

आज चांदीच्या दरांतदेखील मजबूती पाहायला मिळतेय. (wedding)त्यामुळं गुंतवणुकदार आणि ग्राहकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. बाजारात आज चांदीची किंमत 199 रुपये प्रति ग्रॅम इतकी आहे. तर एक किलो चांदीच्या दरांत 1,99,000 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीची मागणी वाढल्यामुळं चांदीचा दर उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे.आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 870 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 1,30,310 रुपयांवर सोनं स्थिरावलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली असून 1,19,450 रुपयांवर प्रतितोळा सोनं पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रुपयांची वाढ झाली असून 97,730 रुपयांवर सोनं स्थिरावलं आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
- 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,19,450 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,30,310 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 97,730 रुपये - 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,945 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 13,031 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,773 रुपये
8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 95,560 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 1,04,248 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 78,184 रुपये
- मुंबई – पुण्यात कसे (wedding)असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,19,450 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,30,310 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 97,730 रुपये
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट