वाइनच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षांच्या(expensive) स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या पार्टीमध्ये नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला. त्यामुळे वाइन उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचाच परिणाम म्हणून वाइनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. यामुळे द्राक्ष उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिणामी राज्यातील वाइन उत्पादनातही १ कोटी लिटरची घट होण्याची शक्यता आहे. उत्पादनातील या घटीमुळे वाइनचे दर वाढण्याची शक्यता आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. वाइनसाठीच्या द्राक्ष शेतीचे क्षेत्र १० हजार हेक्टरवरून ६ हजार हेक्टरपर्यंत खाली आल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याला यावर्षी पावसाने झोडपून काढले. दिवाळीपर्यंत पाऊस पडला.(expensive) यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शेतीचे मोठे नुकसान झाले. द्राक्षांचे अधिक उत्पादन असलेल्या नाशिक, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना देखील पावसाने झोडपून काढले होते. याठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती देखील होती. यामुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या.

सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्षांच्या उत्पादनात घट झाली(expensive) जवळपास ६० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचाच परिणाम वाइन उत्पादनावर झाला असून त्यामध्ये एक कोटी लिटरने घट झाली असल्याचे सांगितले जात आहे. वाइन उद्योगाकडून दरवर्षी २० ते २५ रुपये किलो दराने द्राक्ष खरेदी केले जाते. पण यावर्षी पावसामुळे जास्त नुकसान झाल्यामुळे द्राक्ष प्रति किलो ४० ते ५० रुपयांना मिळणं देखील कठीण झाले होते. द्राक्ष उपलब्ध कमी झाले आणि जास्त किमतीत द्राक्ष खरेदी केले गेले. दरवर्षी ३ कोटी लिटर वाइनची निर्मिती होते. पण यंदा १ कोटी लिटरने घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता वाइनच्या दरावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट