ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून(license)परिवहन विभागाने कठोर नियम लागू केले आहेत. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चालक प्रशिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आता चाचणी प्रक्रिया पारदर्शक आणि कडक करण्यात आली आहे. याआधी RTO ऑफिसमध्ये पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया होत होती; मात्र नव्या प्रकल्पामुळे सर्व नियम पुन्हा आखण्यात आले आहेत.परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार पक्क्या लायसन्ससाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे आता सक्तीचे झाले आहे. चाचणी केंद्रांवर अधिकाऱ्यांची अनिवार्य उपस्थिती, कागदपत्रांची अचूक तपासणी आणि सीसीटीव्ही अंतर्गत परीक्षेची नोंद ठेवणे ही कार्यालयांची जबाबदारी ठरणार आहे. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे ८० टक्के अपघात होत असल्याचे दिसून आल्याने ही कडक पावले उचलण्यात आली आहेत.

परिवहन विभागाने सुरू केलेला ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक प्रकल्प पूर्ण होईपर्यंत (license)तात्पुरत्या चाचणी मार्गावर CCTV देखरेख बंधनकारक असेल. चाचणीची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवून तपासणी समितीला उपलब्ध करून देणे हे प्रत्येक RTO कार्यालयासाठी अनिवार्य असेल.परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास किंवा अनुत्तीर्ण प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास अधिकारी वर्गावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, उत्तीर्ण झालेल्या ५ टक्के अर्जदारांची पुन्हा चाचणी घेऊन त्याचा अहवाल विभागास सादर करावा लागणार आहे. त्यामुळे लायसन्स देताना नियमपालन अधिक कडक राहणार आहे.

नवीन नियमांनुसार पक्क्या लायसन्ससाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे सर्व (license)अर्जदारांना सक्तीचे आहे. दररोज किती वाहनांची चाचणी घ्यायची आणि कोणत्या वाहनप्रकारासाठी किती वेळ देय, याचे वेळापत्रक RTO कार्यालयांनी काटेकोरपणे पाळायचे आहे. चाचणी घेण्यासाठी नियुक्त अधिकारी मैदानावर उपस्थित राहणे बंधनकारक असून प्रत्येक अर्जाची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये केली जाणार आहे.परवाना प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा सेवा हमी कायद्याअंतर्गत वेळेत पूर्ण करणे अनिवार्य राहील. प्रक्रियेत विलंब, गैरव्यवहार किंवा अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश जारी केले आहेत.

हेही वाचा :

शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!

सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान

१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट