विमानसेवांचं वेळापत्रक कोलमडल्याने देशासह परदेशी नागरिकांना(passengers)नाहक त्रास सहन करावा लागला होता. देशातील अेक विमानतळावर प्रवाशी अडकून पडले होते. आता त्या प्रवशांना इंडिगोकडून नुकसान भरपाई दिली जात आहे. यातून प्रवाशांना १०,००० रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर दिले जाणार आहे. एका निवेदनातून इंडिगोने याबाबतची घोषणा करताना म्हटले आहे की, “आमच्या ग्राहकांची काळजी घेणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”

त्यानुसार कामकाजातील व्यत्ययानंतर आम्ही रद्द केलेल्या उड्डाणांसाठी आवश्यक(passengers) असलेले सर्व परतफेड सुरू केली आहे. ज्यांना परतफेड मिळाली नाही त्यांच्या खात्यात लवकरच परतफेड जमा होईल. ” तसेच ३/४/५ डिसेंबर २०२५ रोजी प्रवास करणारे आमचे काही ग्राहक काही विमानतळांवर काही तास अडकून पडले होते आणि त्यापैकी अनेकांचे मोठे नुकसान झाले. ज्या प्रवाशांचे नुकसान झाले आहे, त्यांना कंपनी १०००० रुपयांची नुकसान भरपाई देणार आहे.

पुढील १२ महिन्यांसाठी इंडिगोच्या कोणत्याही प्रवासासाठी हे ट्रॅव्हल व्हाउचर वापरता येणार आहे. (passengers)देण्यात येणारी भरपाई ही सध्याच्या सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार असलेल्या वचनबद्धतेव्यतिरिक्तेची आहे. यात इंडिगो ग्राहकांना फ्लाइटच्या ब्लॉक वेळेनुसार ५००० ते १०००० पर्यंतची भरपाई करणार आहे. ज्याची फ्लाइट डिपार्चर वेळेच्या २४ तासांआधी रद्द झाले आहेत. त्यांनाच ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट