इंडिगो एअरलाईन्सच्या गोंधळाचा परिणाम राजधानी दिल्लीच्या अर्थव्यवस्थेवर पडला आहे.(crores) व्यापार, उद्योग, पर्यटनाशी संबंधित सेक्टर्समध्ये आर्थिक नुकसान होत आहे. मागच्या दहा दिवसांमध्ये मार्केटमधली गर्दी कमी होऊ लागली आहे. दररोज उड्डाणं रद्द होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.१ डिसेंबरपासून आतापर्यंत इंडिगोची चार हजार उड्डाणं रद्द झालेली आहेत. यामध्ये दिल्ली एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा समावेश आहे. एरव्ही दिल्ली एअरपोर्टवरुन दररोज साधारण दीड लाख लोक प्रवास करतात.

परंतु सध्या प्रवाशांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. विशेषतः(crores) व्यापारी प्रवाशांच्या कमतरतेमुळे शहरातल्या बाजारावर परिणाम झाला आहे.व्यापरी संघटना CTIचे चेअरमन बृजेश गोयल यांनी सांगितलं की, दररोज साधारण ५० हजार व्यापारी आणि उद्योजक दिल्लीमध्ये येतात. परंतु विमान उड्डाणं रद्द झाल्याने ही संख्या झपाट्याने घटत चालली आहे.

दिल्लीतल्या महत्त्वाच्या मार्केटमध्ये मागच्या दहा दिवसांमध्ये (crores)फुटफॉल २५ टक्क्यांनी घटलं आहे. त्याचा परिणाम विक्री आणि व्यवसायावर दिसून येतोय.विमान उड्डाणं रद्द झाल्याने उद्योग, पर्यटन, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यासह इव्हेंट सेक्टरवर परिणाम झाला आहे. त्यामुळे एक हजार कोटी रुपयांपर्यंतचं नुकसान झालं आहे. कित्येक लग्नसमारंभासाठी पाहुणे वेळेवर पोहोचू शकले नाहीत. काही ठिकाणी तर नवरा-नवरीच्या घरातले लोकच पोहोचू शकले नाहीत, असंही सीटीआयने सांगितलं.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट