सध्या थिएटरमध्ये सुरू असलेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे पुन्हा(searched)एकदा भारत-पाकिस्तानबद्दल चर्चा होऊ लागली आहे. भारताचा शेजारील देश पाकिस्तानात राहणारे लोक गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? नुकतंच गुगलने पाकिस्तान गुगल सर्च ट्रेंड्सबद्दलची माहिती दिली आहे. क्रिकेट, खेळाडू, लोकल न्यूज, टेक्नॉलॉजी, रेसिपी आणि ड्रामा यांसारख्या विविध कॅटेगरीमध्ये पाकिस्तानातील लोक काय सर्वाधिक सर्च करतात, याबद्दलची माहिती या सर्च ट्रेंड रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

विविध कॅटेगरीमधील Top Searches
क्रिकेटमध्ये सर्वाधिक Pakistan vs South Africa
Athletes मध्ये सर्वांत जास्त Abhishek Sharma
स्थानिक बातम्यांमध्ये (searched)सर्वांत जास्त Punjab Socio-Economic Registry
टेक्नॉलॉजीमध्ये सर्वांत जास्त Gemini
रेसिपीमध्ये सर्वांत जास्त Sandwich Recipes
How To Searches मध्ये सर्वांत जास्त How to check e-challan Karachi
ड्रामामध्ये सर्वांत जास्त Sher

टेक्नॉलॉजी ट्रेंड्सबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानमधल्या (searched)लोकांनी जेमिनायशिवाय डीपसीक, गुगल एआय स्टुडिओ आणि आयफोन 17 यांनाही सर्वाधिक सर्च केलंय. आयफोन 17 टॉप सर्चमध्ये असल्याचं पाहून हे स्पष्ट होतंय की पाकिस्तानमध्ये परिस्थिती कशीही असली, महागाई कितीही असली तरी पाकिस्तानी लोक स्वत:ला ट्रेंडनुसार अप टू डेट ठेवण्यापासून मागे हटत नाहीत. टॉप 5 मध्ये जेमिनाय, तमाशा, डीपसीक, मायको आणि On4t यांचा समावेश आहे. How to Searches कॅटेगरीमध्ये चलान कराचीशिवाय How to see unsent Instagram messages, How to do car insurance, How to invest in crypto market आणि How to invest in stock market याबद्दल सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे.

क्रिकेट ट्रेंड्सबद्दल बोलायचं झाल्यास पाकिस्तानमध्ये (searched)जरी Pakistan vs South Africa सर्वाधिक सर्च करण्यात आला असला तरी टॉप 5 मध्ये Pakistan Super League, Asia Cup, Pakistan vs India आणि Pakistan vs New Zealand हेसुद्धा सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. तर Athletes विभागात भारतीय स्टार क्रिकेटपटू अभिषेक शर्माशिवाय Hassan Nawaz, Irfan Khan Niazi, Sahibzada Farhan आणि Muhammad Abbas टॉप 5 मध्ये आहेत.

हेही वाचा :

शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!

सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान

१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट