बिग बॉसचे काऊंटडाऊन सुरू, सलमान खानच्या शो चा पहिला लुक समोर, बदलला Logo

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन लवकरच येत आहे. शोच्या निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केली आहे. निर्मात्यांनी नवीन लोगो प्रोमो व्हिडिओ(video) शेअर करून शोचा फर्स्ट लुक दाखवला आहे. यासोबतच शोच्या १९ व्या सीझनची थीम देखील समोर आली आहे. शोच्या निर्मात्यांनी त्याचा फर्स्ट लूक देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये(video) बिग बॉसचा प्रसिद्ध आय लोगो दिसतो. यासोबतच शोच्या थीमबद्दल एक संकेत देखील देण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘कोणतीही युक्ती किंवा धोरण काम करणार नाही कारण यावेळी बिग बॉसमध्ये एक अनोखे राजकारण घडणार आहे.’

भारतातील सर्वात लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉसचा १९ वा सीझन यावेळी अनेक मोठ्या बदलांसह परतत आहे. यावेळी केवळ फॉरमॅट पूर्णपणे नवीन नसेल, तर शोच्या लोकप्रिय संवादांमध्ये आणि स्पर्धकांच्या भूमिकांमध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ‘बिग बॉस वॉन्ट्स टू नो’ हे प्रत्येक सीझनमध्ये ऐकायला मिळत होते, परंतु यावेळी प्रेक्षकांना ‘बिग बॉस वॉन्ट्स टू नो’ असे ऐकायला मिळेल.

यावेळी हा शो एकटा सलमान खान नसून आणखी दोन प्रसिद्ध चेहरे होस्ट करणार आहेत. वृत्तानुसार, करण जोहर, फराह खान आणि अनिल कपूर यांना सह-होस्ट म्हणून शोमध्ये आणण्यात येणारे आहे. हे तिघेही होस्ट एकत्रितपणे पाच महिन्यांच्या या सीझनला आणखी मनोरंजक बनवू शकतात. यामुळेच आता बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे की, नक्की कशा पद्धतीने हा शो बनविण्यात येणार आहे आणि कोणकोणते स्पर्धक यामध्ये यावेळी सहभागी होणार आहेत.

त्याच वेळी, सलमान खानला या सीझनसाठी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी १५० कोटी रुपयांची मोठी रक्कम देण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. सलमान २८ ऑगस्ट रोजी पहिल्या भागाचे शूटिंग सुरू करेल, तर शोचा पहिला डान्स परफॉर्मन्स २९ ऑगस्ट रोजी शूट केला जाईल असे वृत्त आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अनेक मोठे सेलिब्रिटी या शो मध्ये यावर्षी सहभागी होणार असल्याची चर्चा आहे आणि यामध्ये राम कपूर, गौरव खन्ना, डेझी शाह यासारख्या सेलिब्रिटींच्या नावाचाही समावेश आहे. मात्र याबाबत कोणतेही खात्रीशीर वृत्त अजून समोर आलेले नाही.

हेही वाचा :

काँग्रेसचा मोठा नेता भाजपाच्या वाटेवर? ‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणेचा जनकच शिंदेंना साथ देणार?

लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

बजेट स्मार्टफोन शोधताय? Infinix घेऊन आलाय बेस्ट डिव्हाईस, किंमत 7 हजारांहून कमी!