थंडीनं महाराष्ट्रावर पकड आणखी भक्कम केली असून, हीच थंडी येत्या (subsided)आठवड्यात मात्र तितकीची तीव्र नसेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अर्थात पुढील 24 तास यासाठी अपवाद असतील. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढच्या 24 तासांसाठी किमान तापमानाचा आकडा 10 ते 16 अंशांदरम्यान राहणार असून, कमाल तापमानाचा आकडा 22 ते 26 अंशांदरम्यान असेल. राज्याच्या किनरपट्टी भागांमध्ये सूर्य डोक्यावर आल्यानंतर हवेत आर्द्रता तुलनेनं अधिक दिसून येईल.उत्तरकेडून येणाऱ्या शीतलहरींनी गेल्या काही तासांमध्ये मुंबई, नवी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कहर पाहायला मिळाला. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रवेश करत असताना मात्र थंडीच्या लाटेची तीव्रता कमी होणार असून, गारठा मात्र कायम राहील असा इशारा जारी करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील धुळ्यामध्ये किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून, इथं पारा 6 अंशांवर पोहोचला होता. पुढील 24 तासांमध्ये हे तापमान 8 अंशांपर्यंत पोहोचू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे.

पुढचे 24 तास कोकणासाठी कोरड्या हवामानाचे राहणार असून, (subsided)मुंबईतसुद्धा काहीशी अशीच स्थिती दिसून येईल जिथं किमान आणि कमाल सरासरी तापमान अनुक्रमे 20 ते 33 अंशांदरम्यान राहील. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातही हवा कोरडी राहणार असून, सूर्य माथ्यावर आला तरीही हवेत गारठा मात्र कायम असेल. तर, घाटमाथ्यावर धुक्याची चादर पाहायला मिळेल. मराठवाडा आणि विदर्भसुद्धा या हवामानास अपवाद ठरणार नाही. छत्पपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी इथं कोरडं हवामान आणि निरभ्र आकाश अशी काहीशी स्थिती असेल. तर, विदर्भात मात्र राज्यातील इतर जिल्यांपेक्षा तुलनेनं अधिक प्रमाणात थंडी पाहायला मिळेल. अकोला, वर्धा, अमरावती, गोंदिया इथं थंडीचा कडाका वाढलेला असेल.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर येथील पर्वतीय भागांमध्ये तुरळक(subsided) ठिकाणी हिमवृष्टीचा अंदाज आहे. तर, मैदानी क्षेत्रांमध्ये तापमानात चढ उतार होताना दिसतली. अद्याप काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ सुरु झाला नसल्यानं थंडीचं प्रमाणं तितकंसं दिसून येत नाही. दरम्यान देशाच्या दक्षिणेकडेसुद्धा आता या शीतलहरी पोहोचल्या असून, केंद्रीय हवामानशास्त्र विभाह अर्थात आयएमडीनं तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांसाठी पुढच्या 24 तासांच थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. तेलंगणातील आदिलाबाद, कुमारम भीम असिफाबाद, संगरेड्डी आणि मेदक अशा भागांमध्ये शीतलहरी वाहतील. तर, केरळ आणि तामिळनाडूत पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज आहे. मात्र इथंसुद्धा हवेत अल्हाददायक गारवा जाणवेल असा अंदाज आहे
हेही वाचा :
इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग