सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी गावात मंगळवारी दुपारी (shaking)फटाके कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. शोभेच्या दारूचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की भाळवणीसह आसपासच्या सुमारे पाच किलोमीटर परिसरात जोरदार हादरे जाणवले. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्फोटामुळे कारखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली. आगीच्या लोटांनी आकाशात धुराचे मोठे लोट पसरले होते. स्फोटाच्या धक्क्याने आसपास उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान झाले असून अनेक घरांच्या काचा फुटल्या किंवा त्यांना तडे गेले आहेत. काही ठिकाणी भिंतींनाही भेगा पडल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे.

या दुर्घटनेत आफताब मन्सूर मुल्ला आणि अमीन मुल्ला हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.(shaking)स्फोटाच्या वेळी ते कारखान्यातच काम करत असल्याची माहिती असून, जखमींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून विशेष उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अनेक बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

काही काळ आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या, (shaking)मात्र अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिसर सील केला असून नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आले आहे.दरम्यान, हा फटाके कारखाना अधिकृत परवान्याने सुरू होता की नाही, तसेच सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. स्फोटाचे नेमके कारण काय याचा तपास पोलिस व संबंधित यंत्रणांकडून केला जात असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या