सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला.(Game)अनेकठिकाणी क्रॉस व्होटिंगचे प्रकार घडले असून त्यामुळे भाजपला मोठा फटका बसलाय. सांगली येथे 78 जागांसाठी असलेल्या महापालिकेत भाजपला 39 जागा मिळाल्या. त्यामुळे महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमतापासून भाजप केवळ एक पाऊल दूर राहिले.सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये भाजप स्वबळावर लढली होती. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी 40 जागांची आवश्यकता आहे. परंतु भाजपला 39 जागाच मिळाल्या. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी (Game)आणि काँग्रेसने एकत्र निवडून आणली होती, तर ठाकरेंची सेना, शिंदेंची सेना स्वबळावर लढली होती. भाजपला काठावरचे संख्याबळ मिळाल्यामुळे भाजप कोणाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करते याकडे लक्ष लागून राहिलेय.याठिकाणी भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षात लढत झाली. भाजपच्या प्राजक्ता धोत्रे, मालुश्री खोत आणि प्रकाश पाटील हे 3 उमेदवार विजयी झाले. मात्र याच प्रभागातील ब गटातून उभे असलेले भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग पराभूत झाले. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी पराभूत केलं.
सांगलीवाडी येथील प्रभाग १३ मध्ये धक्कादायक निकाल लागला. येथे भाजपचे नेते माजी (Game)आमदार दिनकर पाटील यांच्या स्नुषा मीनल अजिंक्य पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. या प्रभागातून माजी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या पत्नी काँग्रेसच्या उमेदवार दिपाली पाटील निवडून आल्या. या प्रभागात काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
हेही वाचा :
रात्री कुत्री का रडतात? कारणं वाचून व्हा सावध
नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी
‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला