सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवलेली तान्या मित्तल पुन्हा(revelation) एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. बिग बॉसच्या मंचावर ट्रॉफी जिंकता आली नसली, तरी तिचा आत्मविश्वास, स्पष्टवक्तेपणा आणि कायम हसतमुख असलेलं व्यक्तिमत्त्व यामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र शोदरम्यान आणि शोबाहेर तिच्या आलिशान जीवनशैलीबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे तिला मोठ्या प्रमाणावर टीका, ट्रोलिंग आणि अविश्वासाला सामोरं जावं लागलं. बॉडीगार्ड्स, लक्झरी कार्स आणि आलिशान बंगला असल्याचे दावे केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर खोटेपणाचे आरोप करत सोशल मीडियावर तिच्या संपत्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

या सर्व पार्श्वभूमीवर आता तान्या मित्तलने कंडोम उत्पादन(revelation) करणाऱ्या फॅक्टरीची मालक असल्याचा खुलासा करत टीकाकारांना थेट उत्तर दिलं आहे. न्यूज पिंचला दिलेल्या विशेष मुलाखतीत तान्याने तिच्या फॅक्टरीचा सविस्तर दौरा माध्यमांसमोर उलगडून दाखवला. कच्च्या मालापासून अंतिम उत्पादनापर्यंतची प्रक्रिया, पॅकेजिंग, गुणवत्ता तपासणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेची संपूर्ण यंत्रणा तिने स्पष्ट केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादन केलं जात असून यासाठीची यंत्रसामग्री विविध देशांतून आयात करण्यात आली असल्याचंही तिनं सांगितलं. प्रत्येक उत्पादन स्वतंत्र प्रयोगशाळेत काटेकोर तपासणीनंतरच बाजारात पाठवलं जात असल्याचं तिनं नमूद केलं.

तान्याच्या मते, हा व्यवसाय केवळ नफ्यासाठी नसून रोजगारनिर्मितीचं महत्त्वाचं साधन आहे. तिच्या फॅक्टरीत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कार्यरत असून त्यामुळे अनेक कुटुंबांची उपजीविका चालते. कंडोम फॅक्टरीसारख्या व्यवसायाबाबत समाजात आजही संकोच असल्याचं मान्य करत, या विषयावर मोकळेपणाने बोलण्याची गरज असल्याचं मत तिनं व्यक्त केलं. दौऱ्यादरम्यान फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांनी तिला ‘बॉस’ म्हणून संबोधलं आणि ती एकाहून अधिक फॅक्टरींची मालक असल्याचंही स्पष्ट झालं. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या संपत्तीबाबत पसरवलेले आरोप निराधार असल्याचं समोर आलं आहे.

तान्याने सांगितलं की बिग बॉसच्या प्रवासात ज्या लोकांनी तिच्यावर (revelation) विश्वास ठेवला, त्यांच्यासाठीच तिनं आपलं घर आणि कार्यस्थळ दाखवण्याचा निर्णय घेतला. तिच्या समर्थकांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला, याबद्दल तिनं भावनिक प्रतिक्रिया दिली. शोदरम्यान आपल्यावर सातत्याने मानसिक दबाव टाकण्यात आला, वक्तव्यांची खिल्ली उडवली गेली, तरीही आपण खचून न जाता आत्मविश्वास टिकवून ठेवल्याचं तान्याने सांगितलं. सध्या तिचा हा खुलासा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत असून अनेकांनी तिच्या धाडसाचं आणि स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं आहे. ट्रोलिंगपलीकडे जाऊन स्वतःचं सत्य मांडण्याचं धैर्य तिने दाखवून दिलं आहे.

हेही वाचा :

महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?

लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!Edit