सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू झाला आहे.(salaries) आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे परंतु पगारवाढ येण्यास अजून उशिर होणार आहे. दरम्यान, आता या नवीन वेतन आयोगानुसार पगार कितीने वाढणार असा प्रश्न कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पडला आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सध्या सुरु असलेल्या चर्चांनुसार, आठव्या वेतन आयोगात फिटमेंट (salaries) फॅक्टरमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा दुप्पट होऊ शकतो. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.सरकारी कर्मचाऱ्यांचा नवीन पगार काढण्यासाठी एक सूत्र वापरले जाते. त्यांच्या सध्याच्या पगाराला फिटमेंट फॅक्टरने गुणले की नवीन वेतन मिळते. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर जेवढा जास्त पगारवाढ तेवढी जास्त असणार आहे.
सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ झाला होता. (salaries)यामुळे मूळ वेतन ७,४४० वरुन थेट १८,००० रुपये झाले होते. कमाल वेतन हे २.५० लाख झाले होते.आठव्या वेतन आयोगात १.८ ते २.८६ टक्के असू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पगारवाढ कितीने वाढणार हे यावर निश्चित होणार आहे.

जर फिटमेंट फॅक्टर २.१५गृहित धरला तर पगार कितीने वाढणार ते जाणून घ्या.(salaries) जर मूळ वेतन १८,००० रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर २.१५ तर १८००० गुणिले २.१५ म्हणजेच ३८,७०० रुपये मूळ वेतन होणार आहे. म्हणजेच मूळ पगार थेट १८००० रुपयांवरुन ३८,७०० होणार आहे. हा पगार दुप्पट होणार आहे.सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच पेन्शनधारकांनाही याचा फायदा होणार आहे. पेन्शनची रक्कम मूळ वेतनाशी जोडलेली असते. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. यामुळे खूप फायदा होणार आहे.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश