इराणमध्ये देशव्यापी आंदोलन तीव्र होत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (issues) डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला इशारा दिला आहे. जर इराण सरकारने आपल्याच नागरिकांविरुद्ध हिंसक कारवाया सुरू ठेवल्या तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असं ते म्हणाले आहेत. डेट्रॉईटमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका इराणमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. विशेषतः आंदोलकांच्या हत्या आणि फाशी दिली जात असल्याच्या रिपोर्ट्सवर जास्त लक्ष आहे.इराणमधील आंदोलनाने आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. मानवाधिकार संघटनांच्या मते, शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात मुलांचाही समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची इराणसाठी वापरलेली भाषा कठोर आहे. त्यांनी कोणतीही विशिष्ट कारवाई जाहीर केली नसली तरी, त्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले की वॉशिंग्टन हे प्रकरण फार गांभीर्याने घेत आहे. ट्रम्प यांनी सांगितलं की ते व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर इराणमधील परिस्थितीचा सखोल आढावा घेतील, विशेषतः हत्यांच्या अहवालांवर अचूक डेटा गोळा करतील. अमेरिका कोणत्याही पुष्टीशिवाय निष्कर्ष काढणार नाही, परंतु परिस्थिती चिंताजनक आहे असंही त्यांनी सूचित केलं आहे. 

इराणमधील आंदोलनाचे अहवाल समोर आले असून, यातील सर्वात गंभीर म्हणजे (issues)आंदोलकांच्या कथित हत्या आणि फाशी. जेव्हा ट्रम्प यांना या आरोपांबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितलं की, जर हजारो लोक मारले जात असतील आणि आता फाशीच्या बातम्या येत असतील तर ते इराणसाठी चांगलं नसेल. मानवाधिकार संघटनांच्या मते, आतापर्यंत किमान 505 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात नऊ मुले आहेत. याशिवाय, 133 सुरक्षा दलाचे सदस्य, एक अभियोक्ता आणि अनेक नागरिकांनीही आपले प्राण गमावले आहेत. या आकडेवारीवरून हे आंदोलन आता केवळ सरकार विरुद्ध लोक अशा संघर्षापुरती राहिली नसून, संपूर्ण देशाला प्रभावित करणारं एक संकट झालं आहे. व्हाईट हाऊसने इराणबाबत अनेक पर्याय खुले असल्याचे संकेत दिले असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, राजनैतिकता ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. परंतु हवाई हल्ले देखील पर्यायांपैकी एक आहेत. ट्रम्प यांनी एक मोठा आर्थिक निर्णय देखील जाहीर केला. त्यांनी घोषणा केली की इराणसोबत व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशावर अमेरिकेसोबतच्या सर्व व्यापारावर 25 टक्के कर आकारला जाईल. ट्रम्प यांनी या आदेशाचे वर्णन अंतिम आणि निर्णायक म्हणून केले.

डिसेंबरच्या अखेरीस सुरू झालेली ही आंदोलनं आता 187 शहरांमध्ये (issues) पसरली आहेत. 606 हून अधिक ठिकाणी आंदोलनाची नोंद झाली आहे. इराणच्या अलीकडील इतिहासातील हे आंदोलन सर्वात व्यापक मानले जाते. या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया विभागल्या गेल्या आहेत. काही देश याला परकीय हस्तक्षेपामुळे निर्माण झालेली अशांतता म्हणत आहेत, तर अनेक पाश्चात्य देश आणि मानवाधिकार संघटना इराणी सरकारवर अतिरेकी हिंसाचाराचा आरोप करत आहेत. अल जझीरासह अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याचे वर्णन मानवी हक्क संकट म्हणून केले आहे.इराणचे संरक्षण मंत्री अझीझ नासिरजादेह यांनी ट्रम्प यांना उत्तर देताना म्हटले आहे की जर अमेरिकेने हल्ला केला तर तेहरान जोरदार प्रत्युत्तर देईल. त्यांनी सांगितले की इराण कोणत्याही हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देईल आणि कोणालाही धमक्या देण्याची परवानगी नाही. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की इराणमधील सर्व अमेरिकन तळ आणि वॉशिंग्टनच्या कारवायांना पाठिंबा देणाऱ्या देशांना लक्ष्य केले जाईल. त्यांनी पुढे म्हटले की इराणने घेतलेल्या उपाययोजनांमुळे त्यांची संरक्षण परिस्थिती मागील संघर्षांपेक्षा चांगली आहे.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश