भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना (toss)बुधवारी १४ जानेवारी खेळवला जात आहे. हा सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवला जात आहे.या सामन्यासाठी भारतीय संघात बदल झाला आहे. या मैदानात फिरकी गोलंदाजीला मदत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे फिरकी गोलंदाजांकडेही लक्ष असणार आहे.या सामन्यात न्यूझीलंड संघाचा कर्णधार मायकल ब्रेसवेल याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. दरम्यान, भारताचा कर्णधार शुभमन गिलने सांगितले की भारताला प्रथम फलंदाजीच करायची होती. त्यामुळे या निर्णयाने तो आनंदी आहे.

दरम्यान, या मालिकेतून वॉशिंग्टन सुंदर बाहेर गेल्याने त्याच्या जागेवर(toss) प्लेइंग इलेव्हनमध्ये नितीश कुमार रेड्डी याला संधी देण्यात आली आहे. पहिल्या वनडेत सुंदरला बरगड्यांच्या खाली वेदना होत होत्या. त्यानंतर तो या मालिकेतूनच बाहेर झाला आहे. नितीशने यापूर्वी भारतासाठी २ वनडे खेळले आहे.न्यूझीलंड संघाने जेडन लेनॉक्सला पदार्पणाची संधी दिली आहे. त्याला आदित्य अशोकच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कोणताही बदल झालेला नाही.

भारत – रोहित शर्मा, शुभमन गिल कर्णधार, विराट कोहली, श्रेयस अय्यर, (toss)केएल राहुल यष्टीरक्षक, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णान्यूझीलंड – डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे यष्टीरक्षक, मायकेल ब्रेसवेल कर्णधार, झकरी फौल्क्स, जेडेन लेनोक्स, काइल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क

भारतीय संघाने पहिला सामना ४ विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे आता जर दुसरा सामना जिंकला, तर भारतीय संघ मालिकाही खिशात घालेल. तसेच न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी या सामन्यात विजय मिळवाला लागेल.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश