मुंबईसह राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे.(machine) यासाठी मतमोजणीची प्रकिया सुरु आहे. मात्र अशातच जळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ ते ३ मधील मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालंय.

उमेदवारांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम मशीनचे सील आधीच फुटल्याचा गंभीर (machine)आरोप केलाय. या आरोपामुळे मतमोजणीच्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात उपस्थित असताना त्यांना (machine)काही ईव्हीएम मशीनचं सील तुटलेलं असल्याचं दिसून आलं. यामुळे त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला. आरोपानंतर मतमोजणी केंद्रात गोंधळ सुरू झाला आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
ही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश