राज्यात सातत्याने हवामानात बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी थंडी(weather)अशी परिस्थिती आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार पुढील काही दिवस हवामानात चढउतार बघायला मिळेल. ऐन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील अनेक भागात धुवाधार पाऊस झाला. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून दुपारी ढगाळ वातावरण होत आहे. थंडी कमी जात होत असतानाच आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होत आहेत. वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून श्वास घेणेही मुंबईसारख्या शहरात खतरनाक बनले आहे. मतदान करण्यासाठीही अनेक लोक थेट मास्क घालून घराबाहेर काल पडल्याचे बघायला मिळाले. मुंबईची हवा इतकी जास्त घातक आहे की, प्रशासनाने मास्क घालून घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. सध्या उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यात देखील थंडीचा कडाका वाढू शकतो, असा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील किमान (weather)तापमानात घट होईल. डिसेंबर महिन्यात राज्यात कडाक्याची थंडी बघायला मिळाली. मात्र, त्या तुलनेत जानेवारी महिन्यात थंडी कमी झाल्याचे बघायला मिळतंय. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी कमी झाल्या आहेत. उत्तरेकडे सध्या कडाक्याची थंडी आहे. मात्र, येणाऱ्या शीतलहरी त्या तुलनेत खूप कमी आहेत.

निफाडमध्ये राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली.(weather) निफाडमध्ये 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. धुळ्यात 9.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील इतर भागात थंडी कमी झाली असून उकाडा वाढल्याचे चित्र आहे. जानेवारी महिन्यातही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे. मात्र, सध्या सतत हवामानात बदल होत आहे.भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट ते तीव्र थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये पुढील 3-4 दिवस थंडीची ही लाट कायम राहील. उत्तरेकडे थंडी वाढली तर राज्यातही थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश