राज्यासह देशभरात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत.(alert) कधी थंडी, कधी पाऊस तर कधी अचानक उकाडा अशी स्थिती नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. विशेषतः जानेवारी महिन्यात अपेक्षित गारठा जाणवला नाही, उलट अनेक भागात दुपारी उन्हाचा चटका वाढल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने हवामानातील मोठ्या बदलांचा थेट इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीत थंडी कमी जाणवत असून काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. राज्यातील वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत असली तरी दुपारी मात्र उकाडा जाणवत असल्याने नागरिक गोंधळात पडले आहेत.

पुणे शहरात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (alert)मागील काही दिवसांत शहरातील किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र, सोमवारी तापमानात लक्षणीय घट झाली असून वातावरणात पुन्हा थंडावा जाणवू लागला आहे. पुढील दोन दिवस हवामान फारसा बदलणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली असून तेथे 7.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. गोंदिया येथे 9.8 अंश सेल्सिअस तापमान होते. निफाड, गोंदिया आणि धुळे परिसरात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, एकूणच राज्यात थंडी कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.

देशातील विविध भागांतही हवामान सतत बदलत असल्याचे चित्र आहे.(alert) काही ठिकाणी थंडी कमी होत असून काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने काही राज्यांसाठी रिमझिम ते मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांत प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता असून हवामानातील बदलांमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी उकाडा अशी स्थिती सध्या देशभर अनुभवायला मिळत असून पुढील काही दिवसांत तापमानात आणखी बदल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

हेही वाचा :

चपातीऐवजी भाकरी खाणं खरंच योग्य आहे का? जाणून घ्या सल्ला अन् शरीरावर होणारे परिणाम

SBI च्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! नवीन नियम लागू?

फक्त 180 रुपयांची दारू, पण तुफान गाजली! फक्त हिवाळ्यात विकल्या गेल्या 17,90000 बॉटल्स