केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी 2026-27 सालाचा (budget)अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांसाठी कोणत्या नव्या घोषणा होतील, याकडे देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ होणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. या निधीच्या मदतीने शेतकरी बी-बियाणे, खत आणि दैनंदिन शेती खर्च भागवतात. मात्र वाढत्या महागाईमुळे ही रक्कम अपुरी पडत असल्याची भावना शेतकरी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही काळापासून पीएम शेतकरी सन्मान निधीची (budget)रक्कम 6,000 रुपयांवरून 9,000 रुपये करण्याची मागणी होत आहे. जर सरकारने या मागणीला मंजुरी दिली, तर शेतकऱ्यांना दरवर्षी थेट 3,000 रुपयांचा अतिरिक्त फायदा होऊ शकतो. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात याबाबत कोणती घोषणा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचे एकूण 21 हप्ते दिले आहेत. आता शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर, या हप्त्याच्या रकमेत वाढ होणार का किंवा वार्षिक निधी 9,000 रुपये केला जाणार का, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पीक विमा, सिंचन योजना(budget) आणि थेट आर्थिक मदतीसारख्या घोषणांची अपेक्षा आहे. मात्र सध्या सर्वाधिक चर्चा पीएम शेतकरी सन्मान निधीच्या वाढीवर केंद्रित आहे. अर्थसंकल्पात याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. आता सर्वांचे लक्ष 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्प सादरीकरणाकडे लागले असून, सरकार शेतकऱ्यांसाठी कोणता मोठा निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

चपातीऐवजी भाकरी खाणं खरंच योग्य आहे का? जाणून घ्या सल्ला अन् शरीरावर होणारे परिणाम

SBI च्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! नवीन नियम लागू?

फक्त 180 रुपयांची दारू, पण तुफान गाजली! फक्त हिवाळ्यात विकल्या गेल्या 17,90000 बॉटल्स