कल्याण शहरात गुंडगिरी वाढू लागली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाहीये.(incident)आज सकाळी शिवसेनेचे पदाधिकारी शक्ती राय यांच्यावर चार ते पाच जणांनी शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिवसाढवळ्या हल्ल्याच्या घटना घडत असल्यानं शहरात दहशतीचं वातावरण आहे. दरम्यान या हल्ल्यात शक्ती राय यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शक्ती राय यांची एक सेक्युरिटी एजन्सी आहे. संबंधित एजन्सीचा टेंडर संपल्यानंतरही दोन कर्मचाऱ्यांचा थकीत पगाराचा वाद सुरू होता. याच वादातून संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्या साथीदारांसह मिळून शक्ती राय यांच्यावर हल्ला केला असा आरोप केला जातोय.

घटना घडताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. (incident)व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तात्काळ दखल घेत चौकशी सुरू केली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे तपास केला जातोय. या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असून पुढील तपासानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

भिवंडी पश्चिमचे भाजप आमदार महेश चौघुले व कोणार्क (incident)आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याची घटना चार ते ५ दिवसापूर्वी घडली होती. निवडणुकीत भाजप आमदाराच्या मुलाचा पराभव झाल्यानंतर समर्थकांनी माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन्ही पती पत्नी जखमी झाले आहेत. माजी महापौर आणि आमदाराचा मुलाने भिवंडी निजामपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली. त्यांचा पराभव महापौर यांच्या मुलाने केला होता. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश