नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी अत्यंत (plate) महत्त्वाची सूचना समोर आली आहे. राज्यात जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट म्हणजेच HSRP बसवण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 होती. ही मुदत आता पूर्णपणे संपली असून, 1 जानेवारी 2026 पासून नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, आता कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही.यापूर्वी अनेक वेळा मुदतवाढ देऊनही मोठ्या संख्येने वाहनधारकांनी HSRP बसवण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आता वाहतूक पोलिस आणि परिवहन विभागाकडून राज्यभर तपासणी मोहिमा अधिक तीव्र केल्या जाणार आहेत. HSRP नसलेली वाहने आढळल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांसाठी HSRP अनिवार्य आहे.(plate) यामध्ये दुचाकी, चारचाकी तसेच सर्व प्रकारची व्यावसायिक वाहने यांचा समावेश होतो. शासनाने याआधी अनेकदा अंतिम मुदत वाढवली होती, मात्र आता नियम पाळण्यात कोणतीही सवलत दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका परिवहन विभागाने घेतली आहे. दरम्यान, ज्या वाहनधारकांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी अधिकृत विक्रेत्याकडे HSRP साठी वैध अपॉइंटमेंट बुक केली आहे, त्यांना दिलासा देण्यात आला आहे. प्रत्यक्ष नंबर प्लेट बसवण्याची तारीख अंतिम मुदतीनंतरची असली तरी अपॉइंटमेंटचा पुरावा असल्यास अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.

ज्या वाहनांवर अद्याप HSRP बसवलेली नाही आणि कोणतीही (plate) अपॉइंटमेंटही घेतलेली नाही, अशा वाहनांवर आता थेट कारवाई होणार आहे. पहिल्यांदा नियमभंग आढळल्यास वाहनधारकांना 1,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. मात्र वारंवार नियम मोडल्यास हा दंड वाढून थेट 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे 1 कोटी वाहनांवर HSRP बसवण्यात आली आहे. तरीही अजूनही सुमारे 40 लाखांहून अधिक वाहने HSRP शिवाय रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे येत्या काळात तपासणी मोहिमा अधिक कडक होण्याची (plate) शक्यता आहे. HSRP मुळे वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि बेकायदेशीर वापरावर आळा बसतो. तसेच फॅन्सी किंवा नियमबाह्य नंबर प्लेट्स वापरणाऱ्यांवरही स्वतंत्र कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. कायदेशीर अडचणी आणि आर्थिक दंड टाळण्यासाठी वाहनधारकांनी शक्य तितक्या लवकर अधिकृत विक्रेत्याकडून HSRP बसवणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

रात्री कुत्री का रडतात? कारणं वाचून व्हा सावध

नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी

 ‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला