अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि उद्योगपती संजय कपूर (shocking) यांच्या मृत्यूनंतर सुरू असलेला तब्बल 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा वाद आता आणखी गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. 12 जून 2025 रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना संजय कपूर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपत्तीच्या वाटपावरून न्यायालयीन संघर्ष सुरू झाला असून, या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया सचदेव यांनी न्यायालयात सादर केलेल्या मृत्यूपत्रावर संशय निर्माण झाला आहे. करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हे मृत्यूपत्र बनावट असल्याचा दावा केला आहे. आता या प्रकरणात प्रिया सचदेवचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स समोर आल्याने संपूर्ण खटल्याला अनपेक्षित वळण मिळाले आहे.

प्रिया सचदेव यांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, (shocking)संजय कपूर यांच्या मृत्यूपत्रावर 21 मार्च 2025 रोजी गुरुग्राम येथे स्वाक्षरी करण्यात आली होती. त्या वेळी आपण स्वतः उपस्थित असल्याचा दावा प्रियाने प्रतिज्ञापत्रात केला आहे. मात्र आता समोर आलेल्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सनुसार, त्या दिवशी प्रिया सचदेव दिल्लीमध्ये असल्याचे स्पष्ट होत आहे.प्रतिज्ञापत्रातील माहिती आणि तांत्रिक पुराव्यांमधील ही विसंगती न्यायालयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे मृत्यूपत्राच्या सत्यतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, हा दस्तऐवज खरा आहे की बनावट, यावर आता न्यायालय अधिक सखोल चौकशी करण्याची शक्यता आहे.
सीडीआर डेटामुळे करिश्मा कपूरच्या मुलांनी केलेला दावा अधिक (shocking)मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांनी याचिकेत असा आरोप केला आहे की, प्रिया सचदेव यांनी न्यायालयाची दिशाभूल करत चुकीची माहिती सादर केली आहे. विशेष म्हणजे, प्रिया यांनी सादर केलेले मृत्यूपत्र नोंदणीकृत नाही तसेच त्याचे कोणतेही अधिकृत मृत्यूपत्रप्रमाणही उपलब्ध नाही. या मृत्यूपत्रानुसार संजय कपूर यांची संपूर्ण वैयक्तिक संपत्ती प्रिया सचदेव यांनाच देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षदर्शींचे दावे, सादर कागदपत्रे आणि आता समोर आलेले कॉल रेकॉर्ड्स यामुळे या मृत्यूपत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर करिश्मा कपूर यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश