कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झालेत. (calculation) यामध्ये महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. ८१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीला एकूण ४५ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपने २६, शिवसेना १५, राष्ट्रवादी काँग्रेसने ४ तर जनसुराज्य पक्षाने १ जागा जिंकलीये. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला ३५ जागा मिळाल्या असून त्यात काँग्रेसला ३४ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला १ जागा मिळाली.महाविकास आघाडीने अपेक्षित ‘मॅजिक फिगर’ गाठण्यात अपयश आलं असून अवघ्या ३५ जागांवर त्यांना समाधान मानावं लागलंय. त्यामुळे काँग्रेसचा निसटता पराभव झाला आहे. तरीही काँग्रेसने एकाकी झुंज देत ३४ जागा मिळवल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात कार्यकर्त्यांनी गुलालाची (calculation) उधळण करत जल्लोष केला. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन जल्लोष साजरा केला. हलगीच्या ठेक्यावर सतेज पाटील यांनीही ठेका धरत कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी झाले.कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसच्या ३४ जागा निवडून आल्याने पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र महायुतीच्या ४५ जागांच्या तुलनेत काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही. महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत महापालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे.
या निकालावर खासदार धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, (calculation) ज्या शहरात जिल्ह्यात केवळ काँग्रेस व्यतिरिक्त कोणताही विचार चालणार नाही असं म्हणणाऱ्यांना कोल्हापूरकरांनीच चपराक दिलीये. यावेळी त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर सडकून टीकाही केली.अखेरच्या आकडेवारीनुसार, महाविकास आघाडीला ३५ जागा, तर महायुतीला ४५ जागा मिळाल्या आहेत. या निकालामुळे कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला असून काँग्रेसला निसटता पराभव पत्करावा लागला आहे. तरीही काँग्रेसने मिळवलेल्या जागांमुळे पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका आकडेवारी
महाविकास आघाडी – 35
काँग्रेस- 34
शिवसेना- उबाठा – 1
महायुती – 45
भाजप – 26
शिवसेना – 15
राष्ट्रवादी – 4
जनसुराज्य – 1
हेही वाचा :
रात्री कुत्री का रडतात? कारणं वाचून व्हा सावध
नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी
‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला