कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
मुंबई महापालिकेची सूत्रे महायुतीच्या हाती देऊन तेथील मतदारांनी मुंबई कोणाची (brothers) या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ठाकरे बंधू एकत्र येऊनही त्यांना फारसे यश प्राप्त झालेले नाही. मनसेचा व्यक्तिगत दारुण पराभव झाला आहे. जे मुंबईत घडले तेच राज्याच्या बहुतांशी महानगरामध्ये घडले आहे.भाजपने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे “पानिपत” केले आहे. ठाण्यात पुन्हा “शिंदे शाही”आली आहे.काँग्रेसला दोन-तीन महानगरात यश मिळाले आहे. 29 महापालिका मध्ये नगरसेवकांची एकत्रित संख्या 2869 इतकी असून सर्वाधिक नगरसेवक महायुतीचे आहेत. जवळपास पंधराशे पेक्षाही अधिक नगरसेवक महायुतीचे निवडून आले आहेत. राज्यातील शहरी भागातील सर्वसामान्य जनतेने महायुती सरकारच्या कारभारावर विश्वास दर्शवला आहे असे या निवडणुकीच्या निकालातून ध्वनीत होताना दिसते आहे. कोल्हापूर मध्येकाँग्रेसच्या सतेज पाटील यांनी एकांगी झुंज देऊन महायुतीला चांगलाच घाम फोडला आहे.

राज्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणूक (brothers) निकालाकडे लागून राहिले होते. मुंबई कोणाची या प्रश्नाभोवती ही निवडणूक फिरत होती. वीस वर्षानंतर ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र आले होते. त्यांनी प्रचाराच्या केंद्रस्थानी मराठी माणूस आणला होता. पण त्याचा त्यांना या निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी फायदा झाला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर असलेली सत्ता ठाकरेंच्या हातातून निसटून गेली आहे. मुंबई महापालिकेत भाजपने सर्वाधिक जागा लढवल्या होत्या पण तरीही त्यांना स्वतंत्रपणे बहुमत मिळवता आलेले नाही. आता भाजपला शिवसेनेच्या पाठबळावरच महापौर बनवता येणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा गाजत होता. बिगर मराठी समाज हा भाजपाकडे होता. गेल्या दहा वर्षात मुंबईत परप्रांतीयांची 12% मते वाढली होती. पण तरीही भाजपला स्वबळावर सत्ता आणता आलेली नाही. पण त्याचबरोबर मुंबईतील मराठी माणसाने ठाकरे बंधूंना बऱ्यापैकी साथ दिलेली दिसते.
मात्र या निवडणुकीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती (brothers) करूनही त्यांच्या मनसेला दोन अंकी नगरसेवक सुद्धा निवडून आणता आलेले नाहीत. म्हणजे शिवसेनेची युती करून त्यांना फारसा फायदा झालेला नाही हे निर्विवादपणे स्पष्ट झाले आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या. तिथे अजित दादा पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यांच्यातील खडा जंगी गाजली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही त्यांना अपयश आले असून भाजपने तेथे निर्विवाद यश मिळवले आहे.काही अपवाद वगळले तर राज्यातील बहुतांशी महानगरामध्ये तेथील सर्वसामान्य मतदारांनी महायुतीला कौल दिलेला आहे. तेथे महायुतीचा अर्थात भाजपचा महापौर विराजमान झालेला अजितच्या काळात दिसेल. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारांनी महायुतीच्या बाजूनेच निर्णय दिलेला आहे. आणि आता त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे.
इचलकरंजी महापालिकेची ही पहिली निवडणूक होती. इथे भाजपची सत्ता येणार हे अपेक्षितच होते. पण तिथेही सतेज पाटील यांनी शिव शाहू आघाडीचे आव्हान दिले होते.पण (brothers) आता इचलकरंजी महापालिकेवर भाजपचा पहिला महापौर विराजमान होणार आहे.कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीकडे सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. महायुती विरुद्ध काँग्रेसचे सतेज पाटील अशी इथे लढत झाली. ही लढत अटीतटीची होती. महायुतीला 81 पैकी 44 जागा मिळाले आहेत तर जनसुराज्य शक्ती पक्षाची एक जागा महायुतीची समजली जाते. सतीश पाटील यांनी 35 जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेने एक जागा जिंकली आहे. आता या महापालिकेत 45 विरुद्ध 36 असे बलाबल झाले आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर महापालिकेच्या गेल्या सभागृहात सतेज पाटील यांच्या काँग्रेसचे जेवढे नगरसेवक होते त्यापेक्षाही जास्त नगरसेवक त्यांनी या खेपेला निवडून आणले आहेत. म्हणजे एका अर्थाने एकाची झुंज देऊनही त्यांनी सत्तेत येणाऱ्या महायुतीला चांगला घाम फोडला होता हे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असे कितीतरी महत्त्वाचे नेते प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते. त्या तुलनेत महाविकास आघाडीचा गड जिंकण्यासाठी म्हणून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात वगळता अन्य कोणताही नेता इथे आलेला नव्हता.कोल्हापूर महापालिकेच्या विसर्जित सभागृहात शिवसेनेचे चार नगरसेवक होते. शिवसेना अविभाजित होती, तेव्हा शिवसेनेचे सहा आमदार होते पण तेव्हाही या महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या दोन अंकी झाली नव्हती. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कोल्हापूर महापालिकेत 15 नगरसेवक निवडून आणले आहेत हे विशेष.
हेही वाचा :
इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव
कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर