कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीचा महा विजय झाला आहे.(original)त्यातही काही ठिकाणी एक हाती सत्ता मिळवणारा भाजप क्रमांक एक वर आला आहे. शहरी चेहरा अर्बन फेस असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हे यश मिळाले आहे. पण त्यांचे आणि भाजपचे हे यश निखळ आनंद देणारे आहे काय? जुना निष्ठावंत आणि निवडणूक जिंकण्यासाठी पात्रता असलेला निष्ठावंत असे कार्यकर्त्यांचे दोन श्रेणीमध्ये फडणवीस यांनीच विभाजन करून धन दांडग्या निष्ठावंतांना संधी दिली होती. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे तो निष्ठावंत महत्त्वाचा मानला गेल्याने मूळच्या निष्ठावंताने व्यासपीठाचे व्यवस्थापन करावे हाच संदेश दिला गेला आहे. इलेक्टिव्ह मेरिट असलेले भाजपचे किती आणि निवडणुकीच्या आधी वर्षभर येऊन भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले किती? याचा लेखाजोखा भाजपच्या मुखपत्रांनी मांडला पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या सेनेतही फारसे काही वेगळे घडले आहे असे नाही.मुंबईसह 29 महापालिकांमध्ये नगरसेवकांची एकूण संख्या 2869 इतकी असून त्यापैकी 1440 नगरसेवक भाजपाचे आहेत. म्हणजे 50% पेक्षा जास्त नगरसेवक त्यांचे आहेत.

त्यानंतर 404 जागा जिंकणारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे.(original) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अवघे 36 नगरसेवक निवडून आले आहेत त्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांनी आत्मचिंतनच नव्हे तर आत्मक्लेषही करून घेतले पाहिजेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेने तर फारच खराब कामगिरी केली आहे. मुंबईत ठाकरे ब्रँड पूर्णपणे संपला नसला तरी मतदारांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत यांच्या पराभवाचा बँड वाजवला आहे असे म्हणता येईल.मराठी मते गृहीत धरलेल्या ठाकरे बंधूंनी मुस्लिम मते ही आपल्या मागे आहेत असे समजून तीन-चार सभांमध्ये त्यांनी तसे वातावरण तयार केले होते. पण प्रत्यक्षात त्याचा फायदा झाला नाही. या निवडणुक प्रचारादरम्यान भाजपच्या मीडिया सेंटरने सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांचे परस्पर विरुद्ध टीकेचे जुने व्हिडिओ व्हायरल केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठाकरे बंधूंची अफाट श्रीमंती, त्यांचे मातोश्री नंबर एक, मातोश्री नंबर दोन, प्रभू कुंज एक, शिवतीर्थ दोन ही आलिशान निवासस्थाने, मुंबईत गरीब राहिलेला मराठी माणूस, मुंबई महापालिका त्यांच्या हातात असताना बिगर मराठी कंत्राटदारांना दिलेली कंत्राटे याचीच चर्चा सोशल मीडियावर करून मराठी मतदारांमध्ये चलबिचलता निर्माण केली गेली.

ठाकरे बंधूंची महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी घेतलेली (original)मुलाखत अप्रत्यक्षपणे त्यांचेच वाभाडे काढणारी ठरली. मुंबई शहरातील असुविधांवर प्रश्न विचारणारे यांना हे माहीत नव्हते की मुंबई महापालिका 25 वर्षे ठाकरे यांच्याच ताब्यात होती. म्हणजे मुलाखतीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे त्यांनी स्वतःचा पंचनामा केला. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे ठाकरे बंधू ही निवडणूक हरले. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे परावर्तित झाली मात्र ठाकरे शिवसेनेची मते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळली नाहीत. हे सुद्धा या निमित्ताने पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बरेच उमेदवार फार कमी मतानी हारले. तसे झाले नसते तर ठाकरे बंधूंच्या जागा आणखी कमी झाल्या असत्या. अर्थात ठाकरे बंधूंच्या काही जागाही कमी मतांनी हातच्या गेल्या आहेत.तसेच घडले नसते तर चित्र आणखी वेगळे दिसले असते. राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा महा विजय झाला असला तरी निवडून आलेल्या 1440 नगरसेवकांपैकी पक्षात नव्याने आलेले किती? आणि मूळचे भाजपचे किती? हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित केला जाऊ शकतो.

कारण गेल्या वर्षभरात भाजपकडे इन्कमिंग झालेल्या नवागतांना उमेदवारी दिली गेली आहे. (original)त्यामुळे निष्ठावंतांना काही प्रमाणात डावलले गेले आहे.पण निष्ठावंत आणि इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या निष्ठावंत असे विभाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केले आहे. मात्र गेल्या वर्षभरात इतर पक्षातून आलेल्यांपैकी किती जणांना उमेदवारी दिली याची आकडेवारी भाजपकडून दिली गेलेली नाही.राज्यातील 29 महानगरपालिका मध्ये भारतीय जनता पक्षाचे एकूण 1440 नगरसेवक निवडून आले आहेत. पण त्यापैकी बरेच नगरसेवक असे आहेत की ते काँग्रेस संस्कृती मधून भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्व संस्कृतीमध्ये आलेले आहेत. याचा अर्थ हिंदुत्ववादी विचार घेऊन ते भारतीय जनता पक्षात किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आलेले आहेत असे म्हणणे धाडसाचे होईल.

राज्यभरात काही अपवाद वगळता महायुतीचे महापौर होणार आहेत.(original)त्यापैकी भाजपाचे किती आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किती हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. तथापि मुंबई वगळता इतर काही महानगरामध्ये भाजप मवाळ भूमिका घेऊन शिवसेनेकडे महापौर पद दिले जाईल. पण त्या बदल्यात मुंबई महापालिकेवर महापौर पदाचा हक्क सांगायचा नाही
असे धोरण भाजपकडून आणले जाईल. मुंबई महापालिकेवर महायुतीचा महापौर असेल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असले तरी मुंबईचा महापौर भाजपचाच असेल यात शंका नाही. महापौर पद आणि स्थायी समिती सभापती पद ही दोन्ही महत्त्वाची पदे भाजपकडे जातील. उर्वरित पदे शिंदे यांच्या शिवसेनेकडे जातील.

हेही वाचा :

इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर