पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या (public) मतमोजणीला शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. साडेदहाच्या सुमारास निकालाचे कल स्पष्ट होऊ लागल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला. याच दरम्यान गोकुळ शिरगाव येथे गोकुळ दूध संघाच्या दुग्ध कलश पूजन कार्यक्रमात एक वेगळीच राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली. महापालिका निवडणुकीत परस्पर विरोधात उभे ठाकलेले पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील एकाच व्यासपीठावर बसून निकालांची थेट माहिती घेत होते.

गोकुळने २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याच्या (public) पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र मतमोजणीचा कल जसजसा महायुतीच्या बाजूने झुकत गेला, तसतसे मुश्रीफ आणि आबिटकर यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. दुसरीकडे सतत मोबाईलवर निकाल पाहणाऱ्या आ. सतेज पाटील यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती.

कार्यक्रमात भाषण करताना आ. सतेज पाटील यांनी सूचक विधान करत (public) गोकुळच्या जनरेटरचे उद्घाटन करताना नारळ दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते फोडण्यात आला, मात्र जनरेटरचे बटण आपल्या हातात असल्याकडे लक्ष वेधले. यावर व्यासपीठावर हशा पिकला. त्यानंतर भाषण करताना हसन मुश्रीफ यांनी थेट सतेज पाटील यांना उद्देशून, “अहो किती संघर्ष करताय, आता तरी आमच्यासोबत या,” असे म्हणत महायुतीत येण्याचे खुले निमंत्रण दिले.यावर सतेज पाटील यांनी हसतच दोन्ही हात जोडले आणि नकारार्थी मान हलवत, “आधी यांचं आणि केपींचं मिटलं का?” असा सवाल व्यासपीठावरूनच केला. आबिटकर यांनी आपल्या संयमी भाषणात, राजकारण वेगळे असले तरी गोकुळमध्ये पक्षीय भूमिका न आणता दूध उत्पादक शेतकरी हाच केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट केले.महानगरपालिकेच्या निकालाचा ताण असतानाच गोकुळच्या व्यासपीठावर रंगलेल्या या राजकीय टोलेबाजीमुळे वातावरण मात्र हलकेफुलके आणि चर्चेचे ठरले.

हेही वाचा :

रात्री कुत्री का रडतात? कारणं वाचून व्हा सावध

नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी

 ‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला