इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या सीजनला येत्या काही महिन्यात सुरुवात होणार आहे.(grounds) मागच्या वर्षी आयपीएलचं विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जिंकलं होतं. मात्र त्यानंतर बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबीचा विजयोत्सव साजरा होत असताना स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंरीत जवळपास 11 खेळाडूंचा मृत्यू झाला. त्यानंतर चिन्नस्वामी स्टेडियमला कोणतेही क्रिकेट सामने खेळवण्यासाठी अनफिट म्हणून घोषित करण्यात आले. चिन्नस्वामी स्टेडियम हे आयपीएलमध्ये आरसीबीचं होम ग्राउंड होतं, मात्र आयपीएल 2026 साठी आरसीबी त्यांच्या नवीन होमग्राउंडच्या शोधात होती. रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीनुसार येत्या आयपीएल सीजनमध्ये आरसीबी 2 नवीन होमग्राउंड मिळाले आहेत.

एका रिपोर्टनुसार आरसीबीने आयपीएल 2026 चे आपले होमग्राउंडवरचे सामने (grounds) नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियम आणि रायपुरचे शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आरसीबीचे पाच होमग्राउंडवर होणारे सामने हे नवी मुंबईत तर दोन सामने रायपुर स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. 2008 मध्ये लीग सुरू झाल्यापासून चिन्नास्वामी स्टेडियमला आपले होमग्राउंड म्हणणाऱ्या या फ्रँचायझीसाठी हा एक मोठा बदल आहे. बेंगळुरूच्या चाहत्यांसाठी ही निश्चितच काहीशी दुःखद बातमी आहे.
आरसीबीने आयपीएल 2025 चं विजेतेपद जिंकल्यावर 4 जून रोजी चिन्नस्वामी (grounds) स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली. ही घटना चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान घडली. तेव्हापासून, हे मैदान उच्च-स्तरीय क्रिकेटमधून जवळजवळ वगळण्यात आले आहे. आयसीसीने 2025 च्या महिला वबडे वर्ल्ड कपमधून सुद्धा ते काढून टाकण्यात आले. 2026 च्या पुरुष टी20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने त्याला अपात्र ठरवले. तसेच केएससीए महाराजा टी20 ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी सारख्या देशांतर्गत स्पर्धा देखील इतरत्र हलवण्यात आल्या.व्यंकटेश अय्यर, मंगेश यादव, जेकब डफी, जॉर्डन कॉक्स, कनिष्क चौहान, विहान मल्होत्रा, विकी ओस्तवाल, सात्विक देसवाल, रजत पाटीदार कर्णधार, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेजलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान थुषारा, सुवानंद शर्मा, सुवानंद शर्मा, अब्दुल सिंह, सुवानंद शर्मा.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश