तंत्रज्ञानामुळे लोकांच्या जीवनशैलीत अनेक बदल घडून आले. (marriage)काही बदल चांगले होते तर काही वाईट… आपण नवनवीन गोष्टी शिकत प्रगत झालो खरं पण जीवशैलीतील काही चुकीच्या सवयींमुळे आपली जीवनरेखाही दिवसेंदिवस कमी होऊ लागली. पूर्वी १०० वर्षाहून अधिक काळ जगणारी लोक आज मात्र साठीतच जगाचा निरोप घेतात. यासंदर्भातच सोशल मीडियावर एक अनोखी बातमी प्रचंड शेअर केली जाते. बातमी सौदी अरेबियामधून समोर येत असून इथे देशातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे निधन झाल्याचे उघड झाले आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा व्यक्ती तब्बल 142 वर्षे जगला…समोर आलेल्या माहितीनुसार,(marriage)सौदी अरेबियातील या व्यक्तीचे नाव नासेर बिन रादान अल रशीद अल वदाई असे होते. त्यांचे वय बघता ते देशातील सर्वात वृद्ध व्यक्ती होते. व्यक्तीचा जन्म १८०० च्या उत्तरार्धात झाल्याचा दावा केला जात आहे. दक्षिण सौदी अरेबियातील दहरान अल जानौब येथे अंत्यसंस्काराची प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर त्यांना त्यांच्यावर वडिलोपार्जित गावी अल रशीद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अहवालानुसार, ७,००० हून अधिक लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.

कुटुंबाच्या मते, नासेर अल-वादाई हे फार धार्मिक होते. (marriage)त्यांनी आपल्या आयुष्यात ४० वेळा हज यात्रा केली. सांगितले जाते की, त्यांनी ११० व्या वर्षी शेवटचे लग्न केले त्यानंतर ते एका मुलीचे वडील झाले. माहितीनुसार त्यांना एकूण १३४ मुले आणि नातवंडे आहेत. त्यांनी एकूण लग्ने केली आणि त्यांची तिसरी पत्नी ३० वर्षे त्यांच्यासोबत राहिली. तिच्या मृत्यूच्या वेळी तीही ११० वर्षांची होती असे म्हटले जाते. जेव्हा ते मरण पावले तेव्हा हजारो लोक त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. त्यांनी आपल्या आयुष्यात सौदी अरेबियातील अनेक बदलांना जवळून पाहिले. आता जेव्हा 142 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा या बातमीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. आताच्या काळातही एक व्यक्ती इतके वर्षे जिवंत राहिला ही गोष्टी अनेकांना थक्क करून जात आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर