जेव्हा त्वचा आणि केसांची काळजी घेण्याचा विचार (remedies)येतो तेव्हा बहुतेकजण घरगुती उपायांचा अवलंब मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे. तर तुम्हालाही घरगुती उपाय करून तुमची त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर स्वयंपाकघरातील हे मसाले वरदानापेक्षा कमी नाही. चला तर मग आजच्या लेखात मसाल्यांबद्दल जाणून घेऊयात… त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे स्वयंपाकघरातील ‘हे’ 5 मसाले, कोणत्याही वरदानापेक्षा नाही कमी.
बदलत्या ऋतूत तसेच वातावरणात आपण आपल्या त्वचेची अणि केसांची काळजी घेत असतो. अशातच आजकाल बहुतेकजण हे बाजारातील महागडे प्रोडक्ट कडे न वळता घरगुती उपायांचा अवलंब करत आहेत. तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात नैसर्गिक प्रभावी उपाय उपलब्ध आहेत,(remedies) जे त्वचा आणि केसांच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहेत, जसे की दही त्वचेला मॉइश्चरायझ करून मऊ करते आणि टॅनिंग कमी करण्यास देखील मदत करते.

त्यात या उपायांचा आपल्या त्वचेवर तसेच केसांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. यासाठी आजच्या लेखात आपण अशा 5 मसाल्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमची त्वचा आणि केस चमकदार बनवतील आणि अनेक समस्यांपासून मुक्ती देखील देतील.
तुम्ही त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी नारळाचे तेल, बेसन, लिंबू यासारख्या गोष्टींचा वापर अनेकदा केला असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की भाज्या आणि पुलावमध्ये सुगंध आणि चव वाढवणारे मसाले त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतात. चला अशा पाच मसाल्यांबद्दल जाणून घेऊयात.
चमकदार त्वचेसाठी हळद प्रभावी
हळद त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. भारतीय स्वयंपाकघरात नियमितपणे वापरली जाणारी हळद तुमच्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी तसेच जखमा बरे करण्यासाठी(remedies) आणि जळजळ कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
जायफळ देखील अद्भुत आहे
जर चेहऱ्यावर पिग्मेंटेशन किंवा डाग असतील तर ते दूर करण्यासाठी जायफळ हा एक उत्तम मसाला आहे. जायफळ पुड दुधात मिक्स करून चेहऱ्यावर लावा. हळूहळू चेहरा स्वच्छ होऊ लागतो आणि त्वचेचा रंगही सुधारतो.

मेथी केसांसाठी वरदान आहे
मेथीचे दाणे स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात, जे मसाला बनवण्यापासून ते लोणच्यापर्यंत सर्व पदार्थंमध्ये वापरले जातात. मेथी केसांना चमकदार व मऊ बनवते आणि कोंडा कमी करून केस गळणे देखील कमी करते.
केसांसाठी काळे तीळ फायदेशीर
केस गळणे आणि डोक्यातील कोंडा दुर करण्यासाठी व स्कॅल्पला होणारे संसर्ग कमी करण्यासाठी काळे तीळ खूप प्रभावी आहे. ते केसांना चमकदार बनवते आणि केस पांढरे होण्यापासून रोखते.
दालचिनी मुरुमे दूर करेल
दालचिनी हा भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा मसाला आहे, जो मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे आणि तेलकट त्वचेच्या अतिरिक्त सेबमवर देखील नियंत्रण ठेवतो. मधासह दालचिनीचा मास्क बनवून तो चेहऱ्यावर लावणे फायदेशीर ठरेल.
हेही वाचा :
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार?
नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!
दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये! कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक