खरं तर ही तुमच्यासाठी खास बातमी आहे. महिंद्राची वाहने 1.56 लाख रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहेत.(vehicles) विशेष म्हणजे महिंद्राच्या वाहनांच्या किंमतीत कपात 22 सप्टेंबरपासून नव्हे तर 6 सप्टेंबरपासून लागू झाली आहे.
GST Deduction: महिंद्राच्या कारमध्ये 1.56 रुपयांची कपात, जाणून घ्या
Mahindra Xuv700

GST चे नवे दर नवरात्रीपूर्वी 22 सप्टेंबरपासून लागू होतील.(vehicles) GST चा नवा स्लॅब जाहीर होताच कार कंपन्यांनी आपल्या कारच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. आधी टाटा, नंतर रेनो आणि आता महिंद्रा कंपनीने आपल्या वाहनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे.

महिंद्राची वाहने 1.56 लाख रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहेत.(vehicles) विशेष म्हणजे महिंद्राच्या वाहनांच्या किंमतीत कपात 22 सप्टेंबरपासून नव्हे तर 6 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एक्स (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) वर ट्विट करून ही माहिती दिली आहे. महिंद्राच्या कोणत्या कारवर तुमची किती बचत होईल हे आम्ही तुम्हाला सांगतो.

महिंद्राने आपल्या एसयूव्हीच्या किंमतीत कपात केली
महिंद्रा अँड महिंद्राने नुकत्याच झालेल्या GST कपातीचा संपूर्ण फायदा आपल्या ग्राहकांना देण्याची घोषणा केली आहे. 6 सप्टेंबर 2025 पासून सर्व महिंद्रा आयसीई (पेट्रोल / डिझेल) एसयूव्हीच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. या वाहनांवर आता ग्राहकांना 1.56 लाख रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. नवीन दर सर्व डीलरशिप आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ताबडतोब लागू होतील.

GST दरांमध्ये काय बदल आहेत?
लहान वाहने – 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या आणि लहान इंजिनअसलेल्या वाहनांवरील GST (पेट्रोल 1200 सीसी, डिझेल 1500 सीसीपर्यंत) 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी यावर 1 टक्के अतिरिक्त उपकर होता, तो आता काढून टाकण्यात आला आहे.

लार्ज इंजिन एसयूव्हीवर पूर्वी 28 टक्के GST सह 22 टक्के सेस लावला जात होता, ज्यामुळे वाहनांवरील एकूण कर 50 टक्के झाला होता. आता वाहनांवर केवळ 40 टक्के GST आकारला जाणार असून उपकर काढून टाकण्यात आला आहे.

दुचाकी – 350 सीसीपेक्षा जास्त पॉवर असलेल्या मोटारसायकलींवरील GST 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे, जो पूर्वीपेक्षा जास्त आहे.

कृषी अवजारावरील GST – ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि थ्रेशर सारख्या कृषी उपकरणांवरील GST 12 टक्क्यांवरून 5 GST करण्यात आला आहे.

ऑटो पार्ट्स – सर्व ऑटो पार्ट्सवर आता समान 18 टक्के GST आकारला जाईल.

ग्राहकांना मिळणार 1.56 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
महिंद्राने आपल्या सर्व पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या एसयूव्हीच्या किंमती कमी केल्या आहेत. मॉडेलनुसार ग्राहकांना 1.56 लाख रुपयांपर्यंत बचत करता येईल. यामुळे बोलेरो निओ, थार आणि एक्सयूव्ही 3 एक्सओ सारखी वाहने आता आणखी स्वस्त झाली आहेत. महिंद्राच्या वाहनांच्या कमी झालेल्या किमतींबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.

‘या’ कारची किंमत किती कमी झाली?
बोलेरो/ निओ खरेदी केल्यास ग्राहकांना 1.27 लाख रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील. एक्सयूव्ही 3 एक्सओ (पेट्रोल) च्या किंमतीत 1.40 लाख रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. एक्सयूव्ही 3 एक्सओ (डिझेल) च्या किंमतीत 1.56 लाख रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. थार 2 डब्ल्यूडी (डिझेल) खरेदी केल्यास ग्राहकांना 1.35 लाख रुपयांपर्यंत आणि थार 4 डब्ल्यूडी (डिझेल) खरेदी केल्यास 1.01 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळेल. थार रॉक्सच्या किंमतीत 1.33 लाख रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. तर स्कॉर्पिओ क्लासिकच्या किंमतीत 1.01 लाख रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. स्कॉर्पिओ-एन खरेदी केल्यास ग्राहकांना 1.45 लाख रुपयांपर्यंत फायदे मिळतील. याशिवाय एक्सयूव्ही 700 च्या किंमतीत 1.43 लाख रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार? 

नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!

दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये! कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक