टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) हा सध्या विश्रांती करत आहे. त्याने भारतासाठी शेवटचा सामना हा चॅम्पियन ट्राॅफीचा शेवटचा फायनलचा सामना होता. त्यानंतर तो आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसला. त्याचबरोबर त्याने टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून देखील निवृती घेतली आहे. त्यामुळे तो आता एकदिवसीय सामने खेळताना दिसणार आहे. आता रोहित शर्माच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

वृतांच्या माहितीनुसार सांगितले जात आहे की रोहित शर्मा हा मध्यरात्री मुंबईमधील कोकिलाबेन हाॅस्पिटलमध्ये पाहायला मिळाला, हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रोहित शर्माचे चाहते त्याच्या क्रिकेट मैदानात परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्त झालेला हिटमॅन आता फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये सक्रिय आहे. आयपीएल २०२५ नंतर चाहते त्याला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार होती, जी पुढील वर्षी पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. अलिकडेच, रोहित बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याच्या फिटनेस टेस्टसाठी बेंगळुरूला गेला होता, जो त्याने यशस्वीरित्या उत्तीर्ण केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या त्याच्या तयारीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल होते.

रोहितने भारतासाठी शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळला, जो टीम इंडियाने जिंकला. मे महिन्यात त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने ६७ सामन्यांमध्ये ४०.५८ च्या सरासरीने ४,३०१ धावा केल्या आहेत, ज्यात १२ शतके आणि २१२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. रोहित शर्मा आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर थेट खेळताना दिसणार आहे, जिथे भारताला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. ही मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

आशिया कप २०२५ नंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाईल. ज्यामध्ये रोहित शर्मा पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ज्यासाठी रोहितने बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याची फिटनेस चाचणी देखील उत्तीर्ण केली आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार? 

नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!

दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये! कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक