पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) इटलीच्या (meloni)पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी भारत आण युरोपियन यूनियन यांच्यातील व्यापार करार यशस्वी करण्यास मदत केल्याबद्दल मोदी यांनी मेलोनी यांचे आभार मानले. PM मोदींचा जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून संवाद,’या’ महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी भारत आण युरोपियन यूनियन यांच्यातील व्यापार करार यशस्वी करण्यास मदत केल्याबद्दल मोदी यांनी मेलोनी यांचे आभार मानले. आज दोन्ही नेत्यांनी गुंतवणूक, (meloni) संरक्षण, सुरक्षा, स्पेस, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण आणि दहशतवाद यासारख्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये असलेल्या करारांबाबत चर्चा केली आणि आगामी काळातील रणनीतीवर प्रकाश टाकला.

आज दोन्ही नेत्यांनी 2025 ते 2029 या काळालीत धोरणात्मक कृती आराखड्यावर चर्चा करत पार्टनरशीप आणखी वाढवण्याबाबत भाष्य केले. जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत झालेल्या फोन कॉलची माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ” इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.
भारत-इटली यांच्यातील धोरणात्मक पार्टनरशीप आणखी मजबूत करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपावा याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. भारत आणि युपोपियन युनियनमधील व्यापार करार पूर्ण करण्यासाठी आणि आयएमईईईईसी उपक्रमाद्वारे कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी इटलीच्या सक्रिय पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मेलोनी यांचे आभार.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांची नेहमीच चर्चा होत असते. कॅनडामध्ये जून महिन्यात जी 7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली होती. (meloni)त्यावेळी झालेल्या संभाषणात मेलोनी आणि पंमोदी यांच्यातील मैत्री स्पष्टपणे दिसून आली होती. मेलोनी यांनी म्हटले होते की, ‘पंतप्रधान मोदी हे’बेस्ट’ आहेत. मी त्यांच्यासारखी बनण्याचा प्रयत्न करत आहे.’

जी 7 शिखर परिषदेत झालेल्या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भेटीबद्दल X वर एक पोस्ट देखील शेअर केली होती. पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, “इटलीसोबत भारताची मैत्री आणखी मजबूत होत राहील, ज्याचा आपल्या लोकांना खूप फायदा होईल!”
हेही वाचा :
बार डान्सरसोबत पोलीस अधिकाऱ्याचा अश्लील डान्स; Video Viral
मोठी बातमी! भाजपला दे धक्का, 8 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Asia Cup 2025 सामन्यांची रंगत अजूनच वाढणार, कॉमेंट्री पॅनलमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश