आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय(politics) समीकरणांमध्ये मोठे बदल घडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीसोबतच इतर पक्षांतही नेते व कार्यकर्त्यांचे पक्षांतर सुरू आहे. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडूंना विदर्भात मोठा धक्का बसला आहे.

मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी प्रहार संघटनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अमरावतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे काँग्रेसला मेळघाट मतदारसंघात बळकटी मिळणार आहे.

विशेष म्हणजे, राजकुमार(politics) पटेल यांनी गेल्या काही वर्षांत तब्बल पाचव्यांदा पक्षांतर केले आहे. त्यांनी यापूर्वी बसपा, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार अशा वेगवेगळ्या पक्षांत काम केले असून आता काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रहारकडून उमेदवारी घेतली होती. मात्र भाजप उमेदवार केवलराम काळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. आतापर्यंत त्यांनी सात वेळा निवडणूक लढवली असून, तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत तर चार वेळा पराभवाचा सामना केला आहे.

राजकुमार पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे मेळघाटात काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे राजकीय जाणकार मानत आहेत. दुसरीकडे, बच्चू कडू यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरत आहे.

हेही वाचा :

‘भगवा पार्टीला हवाय मुस्लीममुक्त भारत…’ भाजप आसामचा Video पाहून भडकले ओवेसी

Vitamin C मुळे पोट, फुफ्फुस आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका होईल कमी

महाराष्ट्र हादरला! पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्याने झापल्याने शेतकऱ्याची विहिरीत उडी