स्मार्टफोन खरेदी करताना प्रत्येक ग्राहकाच्या मनात (smartphone)येणारा एक सामान्य प्रश्न, फोन ऑनलाईन खरेदी करावा की ऑफलाईन? दोन्ही ठिकाणी खरेदी करण्याचे फायदे आणि नुकसान आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

स्मार्टफोन केवळ एक गॅझेट नसून सध्याच्या काळात आपली गरज बनले आहे. प्रत्येकजण त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार स्मार्टफोनची खरेदी करतात. बाजारात अगदी(smartphone) बजेट स्मार्टफोनपासून ते प्रिमियम रेंजमधील महागड्या स्मार्टफोनपर्यंत सर्व प्रकारचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. नवीन स्मार्टफोन खरेदी करताना युजर्स अनेक गोष्टींवर लक्ष देतात, ज्यामध्ये स्मार्टफोनची बॅटरी, कॅमेरा, फीचर्स यांचा समावेश आहे. पण यासर्वांव्यतिरिक्त नवीन स्मार्टफोन खरेदी करताना मनात येणारा एक प्रश्न म्हणजे स्मार्टफोन ऑनलाईन खरेदी करावा की ऑफलाईन.

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणाहून स्मार्टफोन खरेदी करण्याचे फायदे आणि नुकसान आहेत. ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन स्मार्टफोनच्या किंमती कमी असतात. यामध्ये अधिक ऑफर्स आणि बँक डिस्काऊंट समाविष्ट केलं जातं. मात्र ऑफलाईन खरेदी करण्याचा फायदा म्हणजे तुम्ही दुकानात जाऊन मोबाईलचे फीचर्स आणि कॅमेरा तपासू शकता. अनेक स्मार्टफोनची तुलना करू शकता. तसेच किंमत कमी करण्यासाठी दुकानदाराला आग्रह देखील करू शकता. मात्र ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही भावतोल करू शकत नाही. याच कारणांमुळे लोकं गोंधळलेली असतात की स्मार्टफोन ऑफलाईन खरेदी करावा की ऑनलाईन? दोन्ही ठिकाणांहून फोन खरेदी करण्याचे फायदे आणि तोटे आहेत, परंतु काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात.

ऑनलाइन मोबाइल खरेदी करावा की नाही
तुम्ही तुमच्या जवळील दुकानातून स्मार्टफोनची खरेदी करणार असाल कींवा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून, दोन्ही ठिकाणी फायदे आणि नुकसान आहे. जर तुम्ही ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला इथे अनेक ऑप्शन्स पहायला मिळणार आहेत. तसेच ऑफलाईन खरेदीपेक्षा ऑनलाईन बँक आणि एक्सचेंज ऑफर्स देखील अधिक असतात.

तुम्ही अनेक उपकरणांची तुलना देखील करू शकता आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम फोन निवडू शकता. तसेच ऑनलाई खरेदी करताना तुम्ही इतर युजर्सनी शेअर केलेले यूजर रिव्यू देखील तपासू शकता. ऑनलाई स्मार्टफोन खरेदी करण्याचे जसे अनेक फायदे आहेत, त्याच पद्धतीने नुकसान देखील आहे. ऑनलाईन खरेदी करताना स्कॅमची शक्यता अधिक असते. जे लोकं सहसा ऑनलाईन खरेदी करत नाही किंवा जे टेक फ्रेंडली नाहीत त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते.

ऑफलाईन खरेदी करणं
जर तुम्ही तुमच्या जवळील दुकानात स्मार्टफोनची खरेदी करणार असाल तर इथे तुम्हाला स्मार्टफोन हातात घेण्याची आणि त्याचे फीचर्स तपासण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही स्मार्टफोन हातात धरून त्याची पोर्टेबिलिटी आणि इतर गोष्टी तपासू शकता. मात्र ऑनलाईनमध्ये ही सुविधा ऑफर केली जात नाही. ऑफलाइन फोन खरेदी करण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुम्ही स्मार्टफोनच्या कॅमेराची गुणवत्ता पूर्णपणे तपासू शकता. जर तुम्हाला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर फोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन खरेदी करणे पसंत करावे.

दोन्हीमध्ये फरक काय
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला चांगली डिल ऑफर केली जाते. पण ऑनलाइन तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत, तर ऑफलाइनमध्ये कमी पर्याय आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइनमधील सर्वात मोठा फरक बहुतेकदा किंमतीत असतो. म्हणून, तुम्ही तुमचा फोन अशा ठिकाणाहून खरेदी करावा जिथे तुम्हाला सर्वात जास्त नफा मिळतो.

हेही वाचा :

टीम इंडियाचा सलग तिसरा विजय,
अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे?
RBI कडून डेबिट कार्ड, लेट पेमेंट आणि मिनिमम बॅलेन्सबाबत मोठे बदल,