जगातील नंबर वन टी-२० फलंदाज अभिषेक शर्माने(batsman) आशिया कपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवत पाच षटकार आणि सहा चौकार ठोकले. सामन्यानंतर प्रसारकांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अभिषेक शर्माने एक खळबळजनक खुलासा केला.

भारताच्या संघाने कालच्या सामन्यात पाकिस्तानच्या(batsman) गोलंदाजांना धुतलं. यामध्ये भारताच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी कमालीची खेळी दाखवली. यावेळी जेव्हा पहिल्याच चेंडुवर पाकिस्तानच्या गोलंदाजांना षटकार मारला. यावेळी शाहीन अफरीदी हा अभिषेकच्या जवळ आला होता. जगातील नंबर वन टी-२० फलंदाज अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवत पाच षटकार आणि सहा चौकार ठोकले. डावखुऱ्या सलामीवीराने अवघ्या ३९ चेंडूत ७४ धावा फटकावत आशिया कपमध्ये भारताचा सलग चौथा विजय मिळवला. रविवारी रात्री त्याच्या टी-२० कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेकने एक खळबळजनक खुलासा केला.

पाकिस्तानी खेळाडूंकडून स्लेजिंग

सामन्यानंतर प्रसारकांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अभिषेक शर्माने एक खळबळजनक खुलासा केला, तो म्हणाला की सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडू त्याला शिवीगाळ करत होते. खरंतर, जेव्हा अभिषेकला विचारण्यात आले की तू इतका शांत दिसतोस, पण फलंदाजी करताना तुला काय होते? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेक म्हणाला की पाकिस्तानी खेळाडू मैदानावर काही गोष्टी बोलत होते ज्या त्यांनी बोलायला नको होत्या. अभिषेक पुढे म्हणतो की त्याने आणि शुभमनने ठरवले की त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्या बॅटने उत्तर द्यायचे नाही, तर शब्दांनी नाही.

सामन्यादरम्यान असा एक क्षण आला जेव्हा मैदानावरील वातावरण तापले. अभिषेक शर्माने पाकिस्तानी गोलंदाज हरिस रौफचा चेंडू सीमा ओलांडून पाठवला, ज्यावर रौफने खूप नाराजी व्यक्त केली. संतापलेल्या हरिस रौफने अभिषेक शर्मावर स्लेजिंग करायला सुरुवात केली आणि अभिषेक बसायला तयार नव्हता. दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. परिस्थिती चिघळताना पाहून पंचांना हस्तक्षेप करावा लागला. सामना झाल्यानंतर अभिषेकने जेव्हा प्रेझेंटेशनच्या वेळी सांगितले की जेव्हा मी शाॅट मारत होता. तेव्हा पाकिस्तानचे खेळाडू हे माझ्याकडे रागाने येत होते ते मला आवडले नाही.

अभिषेकने सामन्याची दुसरी इनिंग षटकाराने सुरुवात केली. भारताच्या संघाने 100 हून अधिक धावा या एकही विकेट न गमावता केल्या यावेळीच भारताच्या संघाने सामना नावावर केला होता. अभिषेक शर्मा व्यतिरिक्त, भारताचा कर्णधार आणि सलामीचा साथीदार शुभमन गिलने २८ चेंडूत ४७ धावा केल्या. तिलक वर्मानेही एक उत्तम खेळी केली, त्याने १९ चेंडूत दोन षटकार आणि दोन चौकारांसह नाबाद ३० धावा केल्या. पाकिस्तानकडून, हरिस रौफ आणि फहीम अश्रफ यांनी प्रभावी गोलंदाजी केली परंतु त्यांना त्यांच्या संघाला पराभवापासून वाचवता आले नाही.

हेही वाचा :

सुपर-४ मध्ये पाकिस्तानची धुलाई; 
“देह विकला, सर्कसमध्ये डान्स केला पण…”,
किसमें कितना है दम! जबरदस्त परफॉर्मंस आणि दमदार लूक,