श्रीपूर (ता. माळशिरस): शिक्षण ही फक्त नोकरी मिळविण्याची साधनं नसून समाजाला दिशा देणारी, संस्कार रुजवणारी आणि व्यक्तिमत्त्व घडवणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत शिक्षक ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. श्रीपूर (ता. माळशिरस) येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले सहशिक्षक अमोल बाळासाहेब बंडगर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी (SET) मध्ये यश संपादन करून विद्यार्थ्यांसाठी(students) तसेच संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.

बंडगर सरांनी जीवन विज्ञान या विषयामधून 15 जून 2025 रोजी पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र SET परीक्षेला बसले होते. 30 ऑगस्ट 2025 रोजी निकाल जाहीर झाला असता ते यशस्वी ठरले. यामुळे ते आता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. SET परीक्षा ही UGC मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र तसेच गोवा राज्यांतील उच्चशिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक असलेली अत्यंत प्रतिष्ठेची पात्रता मानली जाते.

सध्या बंडगर सर अकरावी-बारावी विज्ञान शाखेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना(students) विषय समजावून देताना त्यांची पद्धत, संयम आणि विज्ञान विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करते. “शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकापुरते ज्ञान नसून जीवन जगण्याची कला आहे,” हे ते प्रत्यक्ष अध्यापनातून विद्यार्थ्यांना पटवून देतात.

काल निकाल जाहीर झाल्यानंतर अमोल बंडगर सरांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला. माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित अनेकांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या या यशामुळे श्रीपूरसह माळशिरस तालुक्याचा अभिमान वाढला आहे.

अमोल बंडगर यांचे यश हे केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि तरुण शिक्षकांना दिशा देणारे आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती चिकाटी असेल तर यश नक्की मिळते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. श्रीपूर परिसरातील विद्यार्थी व पालकवर्ग त्यांच्या या यशाकडे अभिमानाने पाहत आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी आणखी उंच भरारी घ्यावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.

हेही वाचा :

दसऱ्याचा मुहुर्त साधत, शरद पवारांच्या आमदारचा पुत्र भाजपमध्ये जाणार?

महा-मेट्रोमध्ये करिअरची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

iPhone 17 सह हे प्रोडक्ट्स करा खरेदी आणि मिळवा 10000 रुपयांपर्यंत कॅशबॅक