कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिनांक 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देश वासियांशी संवाद साधताना भारतीयांची यंदाची दीपावली ही गोड होणार अशा आशयाचे आश्वासक उद्गार काढले होते. ती आश्वासनपुर्ती दीपावलीच्या आधीच नवरात्र उत्सवापासून होते आहे. रविवारी देशवासीयांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की नवरात्री(navratri) उत्सव म्हणजे बचत उत्सव सुरू झाला आहे.

वस्तू सेवा करा मध्ये केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पाच टक्के, 12%, 18%, 28%
अशा चार स्लॅब मध्ये वस्तू सेवा कर संकलित केला जात होता. पण आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करून पाच टक्के आणि 18% असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. या बदलामुळे सर्वसामान्य जनतेला बऱ्याच वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.

आत्मनिर्भर भारतासाठी वस्तू सेवा करा तील बदल किंवा कपात हा बूस्टर डोस ठरणार आहे. गंभीर स्वरूपातील आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधावरील वस्तू सेवा कर शून्यावर आणला आहे. याशिवाय आणखीही काही वस्तू या करातून वगळलेल्या आहेत. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वॉशिंग मशीन, फ्रिज वगैरे उत्पादने स्वस्त होणार आहेत. वाहन उद्योगाला या कर कपातीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रात(navratri) विजयादशमीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या पंधराव्यामध्येच त्यांनी टेरिफ कार्ड बाहेर काढले. त्याची झळ जगातील अनेक देशांना बसली आहे. भारताला जास्त प्रमाणात ती बसलेली आहे. कारण या ट्रम्प महाशयांनी ते नरेंद्र मोदी हे माझे मित्र आहेत असे वारंवार सांगत भारताला 50% टेरिफ लावले आहे.

भारताचे अमेरिकेबरोबर असलेले व्यापारी संबंध अडचणीत आणणारे हे टेरिफ आहे. त्याचा फटका भारतातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे हे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना”आत्मनिर्भर भारत”या घोषवाक्याची आठवण करून दिली आहे.

भारतीय उद्योगातून निर्माण होणाऱ्या उत्पादनाला भारतातच मोठ्या प्रमाणावर उठाव मिळावा, आणि लोकांची सुद्धा क्रयशक्ती वाढावी यासाठी म्हणून नरेंद्र मोदी यांनी वस्तू सेवा करात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुरू झाली आहे.

2017 मध्ये केंद्र शासनाने वस्तू सेवा कर प्रणाली (जीएसटी) सुरू केली. त्यातून केंद्र शासनाला प्रचंड प्रमाणावर पैसा मिळाला पण सर्वसामान्य लोकांना महागाईशी सामना करावा लागला होता. अर्थात हा वस्तू सेवा कर लावताना सर्व राज्यांची त्यासाठी मंजुरी आवश्यक होती. सर्व राज्यांनी या करप्रणालीला समर्थन दिल्यानंतर तो देशभर लागू झाला. म्हणजे या कर प्रणालीमुळे जी महागाई झाली त्याला केंद्र शासन एकटे जबाबदार नव्हते.

वस्तू सेवा कर समिती च्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थमंत्री आहेत आणि देशातील सर्व राज्यांचे अर्थमंत्री या समितीचे सदस्य आहेत. आता याच समितीने वस्तू सेवा करा तील कपातील मंजुरी दिली आहे. कर प्रणालीतील कपात ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भारताने मारलेली चपराक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नवरात्र(navratri) उत्सवाच्या शुभेच्छा देताना देशात बचत उत्सव सुरू होत असल्याचेही म्हटले आहे. त्याबद्दल काहीजण टीका करताना दिसतात. आजचा हा बचत उत्सव असेल तर मग कालपर्यंत लूट उत्सव होता का असा सवाल काहीजण विचारताना दिसतात. आणि त्याबद्दल ते केंद्र शासनाला टोमणे मारताना दिसतात. पण वस्तू सेवा कर समितीमध्ये सर्व राज्यांचे अर्थमंत्री सदस्य असतात आणि हे सर्व अर्थमंत्री भारतीय जनता पक्षाचे नाहीत हे या विरोधकांना किंवा टीका करणाऱ्यांना माहीत नसावे किंवा माहित असूनही माहित नसल्यासारखे करावे अशी त्यांची एकूण भूमिका दिसते.

हेही वाचा :

दसऱ्याचा मुहुर्त साधत, शरद पवारांच्या आमदारचा पुत्र भाजपमध्ये जाणार?

महा-मेट्रोमध्ये करिअरची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

iPhone 17 सह हे प्रोडक्ट्स करा खरेदी आणि मिळवा 10000 रुपयांपर्यंत कॅशबॅक