महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ने नागपूर, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांसाठी वरिष्ठ पदांवर भरती सुरू केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२५ आहे. निवड झालेल्या उमेदवारांची(career) नियुक्ती पाच वर्षांच्या करारावर किंवा प्रतिनियुक्तीवर होणार आहे. या भरतीत अनुभवी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.

पदांची माहिती, पात्रता व अर्ज प्रक्रिया कशी असेल? :
चीफ प्रोजेक्ट मॅनेजर(सिग्नलिंग), डेप्युटी जनरल मॅनेजर(लँड मॉनिटायझेशन, सेफ्टी अँड ट्रेनिंग) तसेच सेक्शन इंजिनियर (E&M, टेलिकॉप्युलेशन व AFC, पॉवर सप्लाय, OHE/TRD, IT) अशा विविध पदांसाठी उमेदवारांची गरज आहे. पदानुसार पगाराची मर्यादा ४०,००० ते २,८०,००० रुपये असेल.
चीफ प्रोजेक्ट मॅनेजर साठी इलेक्ट्रॉनिक्स(career) किंवा टेलीकाम्युनिकेशन शाखेत बी.इ./ बी. टेक. पदवीसह १९ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर साठी ७ वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे, तर सेक्शन इंजिनिअर पदांसाठी ३ वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होईल:
उमेदवारांनी आपला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह स्पीड पोस्ट ने General manager (HR), Maharashtra metro rail corporation Ltd., Metro Bhawan, near Dikshabhoomi, Nagpur-440010 या पत्त्यावर पाठवावा. अर्जामध्ये जाहिरात क्रमांक आणि पदाचं नाव स्पष्ट लिहावे. SC, ST व महिला उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क असेल, तर UR व OBC उमेदवारांसाठी ४०० रुपये शुल्क असेल.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होईल: वैयक्तिक मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी. यशस्वी उमेदवारांना ईमेलद्वारे माहिती दिली जाईल आणि पुढील सूचना महा मेट्रोच्या वेबसाईटवर जाहीर केल्या जातील.
महा-मेट्रो ही महाराष्ट्रातील प्रमुख मेट्रो प्रकल्प राबवणारी संस्था आहे. येथे नोकरी मिळवणे म्हणजे आकर्षक पगारा सोबत ही चांगली करिअरची संधी आहे. पात्र आणि अनुभवी उमेदवारांनी अंतिम तारखेपर्यंत अर्ज करून ही संधी गमावू नये.
हेही वाचा :
नवरात्रीच्या उपवासात या चुका करणे टाळा!
गुंतवणुकदारांनो सावध व्हा! भारतीय शेअर बाजारात आजही होणार घसरण,
कतरिना आणि विकीच्या बाळाच्या डिलिव्हरीची तारीख समोर आली