रिद्धी शर्मा यांनी फक्त 50 हजार रुपयांतून सुरुवात करून आज 7 कोटींचा व्यवसाय उभा केला आहे.(kick start) त्यांची कहाणी मेहनत, जिद्द आणि सकारात्मकतेचं उत्तम उदाहरण आहे.

गुजरातमधील जामनगर येथील रिद्धी शर्मा या आयटी इंजिनिअरपासून यशस्वी उद्योजिका बनलेल्या आहेत.(kick start) त्यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने लाखो रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीतून आज करोडोंचा व्यवसाय उभा केला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत गतीत, दुसऱ्या सहामाहीत वेगवान वाढीचे संकेत
रिद्धी कॉलेजच्या काळात अभ्यासासोबतच खेळातही अग्रेसर होत्या. त्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस खेळाडू राहिल्या आहेत. त्यांनी बीई आयटी पदवी घेतल्यानंतर एका आयटी कंपनीत कोडर म्हणून करिअरला सुरुवात केली. परंतु त्यांना मार्केटिंगची आवड असल्याने थोड्याच काळात त्यांनी नोकरी सोडून उद्योजकतेकडे पाऊल टाकले. 2011 मध्ये फक्त 50 हजार रुपयांच्या बचतीतून त्यांनी आणि त्यांच्या पती रिपुल शर्मा यांनी मिळून ‘वेबपिक्सेल टेक्नॉलॉजीज’ ही आयटी कंपनी सुरू केली.
काही वर्षे आयुष्यभर मेहनत घेतल्यानंतर रिद्धींच्या आयुष्यात एक नवा टप्पा आला.(kick start)त्यांचा मुलगा जन्माला आल्यानंतर त्यांनी लक्षात घेतलं की बाजारात लहान मुलांसाठी सुरक्षित आणि नैसर्गिक उत्पादनांची कमतरता आहे. त्यांच्या आजीने घरगुती आयुर्वेदिक उबटन आणि तेल तयार करून दिलं होतं, ज्याचा मुलाला मोठा फायदा झाला. याच अनुभवातून प्रेरणा घेऊन रिद्धीने 2020 मध्ये आपल्या घरातूनच ‘बेबीऑर्गेनो’ नावाचा आयुर्वेदिक हेल्थ व वेलनेस ब्रँड सुरू केला. त्यांनी यात सुरुवातीला फक्त 2 लाखांची गुंतवणूक केली.
पहिल्या सहा महिन्यांत विक्री खूपच कमी झाली, परंतु रिद्धी डगमगल्या नाहीत. त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता ग्राहकांना आवडली आणि हळूहळू विक्री वाढू लागली. 2022-23 मध्ये कंपनीचा महसूल 2 कोटी रुपयांवर पोहोचला. आज तो वाढून 7 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. त्यांच्या 90% विक्री स्वतःच्या वेबसाईटवरून तर उर्वरित अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून होते.
हेही वाचा :
भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही
…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….
परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं