प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत असणारे तुमचे जन धन खाते (account)१० वर्षांचे असल्यास ते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचे कामं करावे लागणार आहे, अन्यथा तुमचे खाते फ्रीझ होऊ शकते. खाते फ्रीझ झाले तर खात्यातून पैसे काढणे, पैसे जमा करणे, सरकारी सबसिडी या सगळ्या गोष्टी थांबू शकता. जर ही गोष्ट टाळायची असेल आणि सरकारच्या सगळ्या योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर 30 सप्टेंबर च्या आधी Re-KYC करणे आवश्यक आहे.

केंद्रातील मोदी सरकार ने आजपर्यंत बँकिंग क्षेत्रानिगडित अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांना सरकारी योजनाचा लाभ घेता यावा म्हणून सरकारकडून 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 55.9 कोटी लोकांची खाती (account)उघडली गेली आहेत. यावर्षी या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या खात्याचे री केवयसी करणे अनिवार्य झाले आहे.वित्तीय संस्था जसे की बँक, आपल्या ग्राहकांची ओळख पडताळणीसाठी KYC चा वापर करतात आणि KYC करणे सगळ्या ग्राहकांlना अनिवार्य असते. आता Re-KYC म्हणजे आपले उपलब्ध असणारे जुने KYC अपडेट करवून घेणे. जसे कि आपले बँक खात्यावरचे नाव, घराचा पत्ता, फोटो आणि मोबाईल नंबर

सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतीत री-केवायसी शिबीर सुरु केले आहे आणि याची प्रक्रिया देखील सोपी ठेवली आहे. केवळ आधार कार्ड आणि पत्याचा पुरावा या दोनच गोष्टी या प्रक्रिये साठी लागणार आहेत.आतापर्यंतच्या सगळ्या खात्यात सुमारे 10 कोटी खाती अशी आहेत ज्यांना उघडून 10 वर्षे पूर्ण होता आहेत. त्यामुळे या खात्यांची जुनी माहिती अपडेट करून घेण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर खाते योग्य व्यक्ती च्या नावावर आहे का? त्याचा काही गैरवापर होतोय का? या गोष्टी तपासण्यासाठी देखील री-केवायसी करणे महत्वाचे आहे.

कोणताही खर्च न करता झिरो बँक बॅलेन्सवर हे खाते उघडले जाते.जमा रकमेवर व्याज देखील दिले जाते.एक लाख रुपयांचा अपघात विमा, सामान्य परिस्थितीत 30 हजरांचा जीवन विमा अशा सरकारी योजनांचा उपयोग घेता येतो.जर बँक अकाउंट सहा महिन्यातून चालू ठेवलं तर 5 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील दिली आहे.या खात्यातून पेन्शन ची देखील सुविधा दिली जाते.

हेही वाचा :

रस्ता पार करण्यासाठी थेट काकांना घेतलं कडेवर Video Viral
कोरोची येथे प्रेमसंबंधातून कोयत्याने हल्ला…
‘सैयारा’च्या यशामुळे मी तणावात होतो…अनुपम खेर…