मुंबई – रंगभूमीवर अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतु कधी कधी हाच रंगमंच एखाद्या कलाकाराचा अखेरचा प्रवास ठरतो. अशीच एक हृदयद्रावक घटना हिमाचल प्रदेशातील चंबा येथे घडली आहे.चंबाच्या प्रसिद्ध रामलीलामध्ये(Ramleela) ७३ वर्षीय अमरेश महाजन गेल्या ४० वर्षांपासून राजा दशरथ यांची भूमिका साकारत होते. मंगळवार रात्रीच्या प्रयोगातही ते रंगमंचावर आपल्या नेहमीच्या जोशात संवाद सादर करत होते.

“मैं अपनी प्रजा के लिए अपने प्राण तक न्योछावर कर दूंगा…” असे संवाद उच्चारताच ते अचानक शेजारी बसलेल्या कलाकाराच्या खांद्यावर झुकले आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला कुणाला हे अभिनयाचा भाग असल्याचे वाटले, परंतु क्षणभरातच सत्य उघडकीस आले.अमरेश महाजन यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे रामलीलेचा(Ramleela) माहोल एका क्षणात शोकाकुल झाला. मंचावरील सहकलाकार आणि प्रेक्षकांना ही घटना धक्का देऊन गेली.

स्थानिकांच्या मते, अमरेश महाजन हे रामलीलेतील “राजा दशरथ” या पात्राशी इतके एकरूप झाले होते की त्यांच्या शिवाय रामलीला अपूर्ण भासत असे. त्यांचा साधा, थेट आणि जिवंत अभिनय प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून राहिला आहे.या घटनेने चंबा परिसरात शोककळा पसरली असून, “राजा दशरथ” म्हणून ओळखले जाणारे अमरेश महाजन यांची आठवण रंगमंचप्रेमींच्या मनात कायम राहणार आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण योजना बंद करणार?
गर्लफ्रेंडचे लग्न ठरत असताना प्रियकराने केलं असं काही की…
३० सप्टेंबरच्या आधी ‘हे’ काम करा, अन्यथा तुमचं अकाउंट बंद होईल