कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीवर व त्याच्या पत्नीवर दोन तरुणांनी हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 40 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्ला करणारा तरुण हा तक्रारदाराच्या चांगलाच परिचयाचे असल्याचे समोर आले आहे. जखमी व्यक्तीच्या मुलीसोबत हल्लेखोर तरुणाचे पुर्वी प्रेमसंबध (Love affair)असल्याचे उघडकीस आले आहे.

लग्नासाठी प्रेयसीला मुलगा बघायला आल्याने प्रियकराने प्रेयसीच्या कुटुंबावरच जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे. सोमवारी एक मुलगा त्या तरुणीला पहायला आला व त्याच रागातून तरुणीच्या पुर्वप्रियकराने तिच्या वडीलांवर चाकूने वार केले. तसेच आईलासुध्दा मारहाण केली. यावेळी झालेल्या हाणामारीत तरुणीच्या वडीलांनी हल्लेखोर तरुणाच्या तोेडावर विट मारुन त्याचे दात पाडले आहे. त्यामुळे पोलिसांनी तरुणीच्या वडीलांविरुध्दही गुन्हा दाखल केला आहे. भारत (३२) आणि अक्षय (३०) या दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

भारतचे एका मुलीसोबत पुर्वी प्रेमसंबध(Love affair) होते. मागील वर्षी भारतने त्या मुलीला पळवून नेले होते. त्यावेळी मुलगी अल्पवयीन होती. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी कुऱ्हा पोलिसात मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली होती. पोलिसांनी मुलीचा शोध घेवून तीला तेलंगणा राज्यातून ताब्यात घेवून आई वडीलांच्या ताब्यात दिले होते. तसेच या प्रकरणी भारतविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी तो तीन महिने कारागृहातसुध्दा होता.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी ही मुलगी अठरा वर्षांची पुर्ण झाली. त्यामुळे तीच्या कुटूंबियांनी तीचे लग्न दुसऱ्या मुलासोबत लावून देण्याच्या उद्देशाने वर संशोधन सुरू केले होते. दरम्यान सोमवारी दुपारी याच तरुणीला पाहण्यासाठी एक मुलगा आला होता. ही बाब भारतला माहीत झाली होती. दरम्यान सोमवारी सांयकाळी साडेसात वाजताच्या सुमारास जेवण झाल्यानंतर मुलीचे वडील बाहेर चक्कर मारायला निघाले होते. त्यावेळी घरापासून काही अंतरावरच भारत व अक्षय या दोघांनी येवून धारदार शस्त्रांनी अचानक तरुणीच्या वडिलांवर वार केले.

हा संपूर्ण प्रकार मुलीच्या आईला ते दिसताच तीने पतीच्या बचावचासाठी धाव घेतली असता या दोघांनी तरुणीच्या आईलासुध्दा मारहाण केली. या हल्ल्यात तरुणीच्या वडीलांच्या हातासह डोके, मनगट, बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच मुलीच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन कुऱ्हा पोलिसांनी भारत व अक्षयविरुध्द प्राणघातक हल्ला करणे, शिवीगाळ करणे मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान हा वाद झाला त्यावेळी तरुणीच्या वडीलांनीसुध्दा भारतला चांगला चोप दिला. विट मारल्यामुळे त्याचे दात पडले व तो जखमी झाला आहे. या प्रकरणी त्याच्या तक्रारीवरुन तरुणीच्या वडीलांविरुध्दही कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन भारत व अक्षयविरुध्द गुन्हा दाखल झाला असून भारत जखमी आहे तर अक्षय पसार असल्याचे कुऱ्हाचे ठाणेदार डॉ. अनुप वाकडे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

रस्ता पार करण्यासाठी थेट काकांना घेतलं कडेवर Video Viral
कोरोची येथे प्रेमसंबंधातून कोयत्याने हल्ला…
‘सैयारा’च्या यशामुळे मी तणावात होतो…अनुपम खेर…