तुम्ही ही नवीन मोबाईल फोन खरेदी करण्याचा विचार करत (important)आहात? तर खरेदी करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे देखील खूप महत्त्वाचे आहे. थोडासा निष्काळजीपणामुळे तुमचे चुकीच्या फोनवर पैसे खर्च होऊ शकतात. आजच्या लेखात आपण फोन खरेदी करण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊयात.

डिस्प्ले क्वालिटी

फोनचा डिस्प्ले जितका चांगला असेल तितकाच वापरणे(important) देखील सुलभ होतो. AMOLED किंवा OLED स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट आणि FHD+ रिझोल्यूशन हे सध्याचे मानक आहेत. म्हणून, तुम्ही 10,000 ते 15,000 रुपयांचा फोन खरेदी करत असलात तरी हे डिस्प्लेचे हे फिचर्स लक्षात ठेवा.

कॅमेरा सेटअप

फोन खरेदी करताना फक्त मेगापिक्सेलवर लक्ष केंद्रित करू नका. कॅमेरा सेन्सर, अपर्चर आणि OIS ही अधिक महत्त्वाची फिचर्स आहेत. जर तुम्ही फोटोग्राफीचे चाहते असाल, तर टेलिफोटो आणि अल्ट्रा-वाइड लेन्स असलेला सेटअप निवडा. तसेच, सेल्फी कॅमेरा आणि त्याचा सेन्सर विचारात घेऊन फोन खरेदी करा.

बजेट सेट करा

प्रथम जेव्हा तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करता तेव्हा बजेट निश्चित करा. आजकाल बाजारात 10,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंतचे फोन उपलब्ध आहेत. तुमच्या गरजा आणि बजेटनुसार योग्य पर्याय निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या गरजा आणि बजेटनुसार फोन निवडा.

रॅम आणि स्टोरेज

मोबाईल फोन खरेदी कराल तेव्हा त्यात कमीत कमी 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणे आवश्यक मानले जाते. शिवाय जर तुम्ही 20,000 पेक्षा जास्त सेल्समध्ये फोन खरेदी करत असाल तर कमीत कमी 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेला फोन घ्या. यामुळे तुम्हाला जास्त फोटो, व्हिडिओ आणि अॅप्स स्टोअर करता येतील आणि हॅग होण्याच्या समस्या टाळता येईल.

बॅटरी आणि जलद चार्जिंग


आजकाल जलद चार्जिंगसह फोन येत आहेत आणि 5000mAh बॅटरी आता सामान्य झाल्या आहेत. 65W किंवा त्याहून अधिक जलद चार्जिंग सपोर्ट असलेला फोन तुम्हाला वारंवार चार्जिंगपासून वाचवेल. शिवाय, जर तुम्ही तुमचा फोन वारंवार वापरत असाल तर तुम्हाला जास्त बॅटरी क्षमता असलेला फोन देखील मिळू शकतो.

ऑपरेटिंग सिस्टम आणि अपडेट्स

फोनमध्ये अँड्रॉइड 15 किंवा आयओएस 18 सारखे नवीनतम व्हर्जन असल्याची खात्री करा. यामुळे फोनमध्ये 3-4 वर्षांसाठी नियमित सुरक्षा आणि सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील. जर तुम्ही 20,000 ते 30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा फोन खरेदी करत असाल, तर दोन वर्षांचे ओएस अपडेट्स असलेला फोन खरेदी करणे टाळा. तुमच्या फोनमध्ये किमान चार वर्षांचे ओएस अपडेट्स असल्याची खात्री करण्याचा प्रयत्न करा.

5जी आणि बिल्ड क्वालिटी

2025 पर्यंत 5जी हे एक आवश्यक फिचर्स बनले आहे. याव्यतिरिक्त, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3 आणि ईएसआयएम सपोर्ट सारख्या फिचर्समुळे फोन भविष्यासाठी तयार होत आहेत. तसेच, फोनची रचना आणि मजबूतपणा विचारात घ्या. काचेची किंवा धातूची बॉडी प्रीमियम फील देते. IP67 किंवा IP68 रेटिंग असलेला फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधक असतो.

हेही वाचा :

घराच्या ‘या’ दिशेला ठेवा या काही गोष्टी,
सर्दीमुळे नाक बंद झाल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय, 
GST कमी झाला आणि ‘या’ कारची किंमत एका झटक्यात 1.20 लाख रुपयांनी उतरली,