सप्टेंबर महिना पूर्ण होत असतानाही पावसानं मात्र अद्याप राज्यातून माघार घेतलेली नाही. (subsided)फक्त महाराष्ट्र नाही, तर इतरही काही राज्यांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. काही राज्यांमध्ये तापमानात एकाएकी वाढ झाली आहे, तर काही भागांमध्ये पावसाळी ढगांमुळं लख्ख सूर्यप्रकाशाला नागरिक मुकत आहेत. यातच केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं पुढील 24 तासांसाठी देशभरातील ओडिशा, गुजरात, महाराष्ट्राचा कोकण किनारपट्टी भाग आणि घाटमाथा इथं पावसाच्या मुसळधार सरींची शक्यता वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेला पट्टा कमकुवत पडला असल्यानं आणि कमी दाबाची प्रणाली गुजरातच्या दिशेनं सरकत असल्या कारणानं राज्यात पावसाचा जोर ओसरल्याचं निरीक्षण हवामान विभागानं वर्तवलं आहे. प्रामुख्यानं कमी दाबाचा हा पट्टा सध्या उत्तरेकडे सरकताना दिसत आहे. (subsided)ज्यामुळं राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असलं तरीही पावसाचा मारा मात्र क्वचित पाहण्यास मिळेल. तर, मुंबई, ठाण्यासह पालघर भाता ऊन – पावसाचा खेळ पाहायला मिळेल. मराठवाड्यातही पाऊस कमी झाल्यानं पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत नांदेडला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला पुढील 24 तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता निर्माण झाली असून यंदा दसऱ्यानंतरच पावसाची अपेक्षित उघडीप अपेक्षित आहे..

एकिकडे पावसाचा जोर ओसरत असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये नव्यानं कमी दाबाची आणखी एक प्रणाली विकसित होत असून पुढील 24 तासांमध्ये तिचा जोर आणखी वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं आता पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार का हाच प्रश्न उपस्थित होत आहे.(subsided) दरम्यान ही प्रणाली पुढील काही तासांत कमकुवत पडली तर मात्र पावसाची फारशी शक्यता नाही हेसुद्धा स्पष्ट.यंदा बराच काळ आधी धडकलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तराखंड, हिमाचल, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीरमधून माघार घेतली आहे. मात्र मागील तीन ते चार दिवसांपासून परतीच्या या प्रवासाचा वेग मंदावल्यानं काही भागांवर रेंगाळलेल्या या पावसाळी ढगांमुळं पावसानं हजेरी लावली.

हेही वाचा :

SUV खरेदी करायचीये का? 

आजचे 1 कोटी 10 वर्षांनी किती होणार,

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म;