निवृत्ती म्हटलं की आपल्याला आठवते ती म्हणजे बचत.(rules) पण महागाईच्या आजच्या काळात फक्त बचत करणे पुरेसे नाही. लोक निवृत्तीसाठी बँकेत पैसे बचत करणे, फिक्स डिपॉझिट करणे, सोन्यात गुंतवणूक करणे अशा अनेक मार्गांचा अवलंब करतात. पण बचत करण्यापेक्षा योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली तर पैसा सुरक्षितही राहतो आणि त्याची वाढही होते. NPS प्रणालीशी संबंधित काही महत्वाचे बदल 1 ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून लागू होणार आहेत.

पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने NPS मध्ये महत्वाचे बदल होणार असे जाहीर केले आहे. हे बदल 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू केले जाणार आहेत. आता गैर-सरकारी क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांना इक्विटीमध्ये 100% पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. (rules) असे केल्याने बाजाराच्या अस्थिरतेचा धोका असेल तरी जास्त रिटर्न मिळण्याची संधी मिळू शकते.याचसोबत एक नवीन मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क सुरू केले जाणार असून गुंतवणूकदार एकाच PRAN क्रमांकावर अनेक स्कीम मॅनेज करू शकतात.
निवृत्तीसाठी केलेल्या गुंतवणुकीतून बाहेर पडणे पूर्वी शक्य नव्हते. गुंतवणूकदार फक्त निवृत्तीच्या वेळी बाहेर पडू शकत होते, पण नव्या बदलांमुळे हे शक्य होणार आहे. 15 वर्षांनंतर गुंतवणुकीतून बाहेर पडणे बदलेल्या नियमांमुळे आता शक्य होईल. याव्यतिरिक्त जर शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा घर बांधणी अशा गरजांसाठी आंशिक पैसे काढणे सोपे होणार आहे. यामुळे निधीवर अधिक सुविधा मिळेल.
यात लक्षात घेण्याची बाब म्हणजे पैसे काढताना कर नियम सारखेच राहतील असे देखील सांगण्यात आले आहे. 80 टक्के एकरकमी पैसे काढण्यासाठी 60 टक्के करमुक्त असून 20 टक्के त्यांच्या उत्पन्न कर स्लॅबनुसार करपात्र असतील. मागच्या वर्षी सरकारने युनिफाइड पेन्शन स्कीम सुरू केली होती. (rules) जी स्कीम फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी होती आणि सौम्य प्रतिसाद होता. आता त्यांना NPS मध्ये परतण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.

यासंदर्भात काम करणारी NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली गेल्या 16 वर्षांपासून एक विश्वासू पर्याय बनली आहे. ही सरकारच्या देखरेखीखाली चालणारी योजना आहे. (rules) या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत नियमित गुंतवणूक करू शकता.तुम्ही गुंतवलेले पैसे शेअर मार्केट , बॉण्ड्स आणि इतर काही सुरक्षित साधनांमध्ये गुंतवले जातात. ही योजना तुम्हाला करसवलत देते. जर तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक केलेली असेल तर तुम्हाला Income Tax मध्ये सूट मिळते. त्याचबरोबर ही योजना बाजाराशी संलग्न आहे. त्यामुळे ही बाजारावर आधारित गुंतवणूक असून जास्त मोबदला मिळण्याची शक्यता असते. आणि विशेष म्हणजे ही सरकारमान्य योजना असल्याने ती सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे.
हेही वाचा :
SUV खरेदी करायचीये का?
आजचे 1 कोटी 10 वर्षांनी किती होणार,
बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म;